मुख्यमंत्री ग्राम सडक योजना दोन वर्षात रस्त्यांची कामे पूर्ण करणार- पालकमंत्री बडोले

0
16

गोंदिया,दि.१७ : ग्रामीण भागाच्या विकासात रस्त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. रस्त्यांमुळे विकासाला चालना मिळते. येत्या दोन वर्षात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात येतील. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
सडक/अर्जुनी तालुक्यातील सिंदीपार येथे १६ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेच्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून तयार करण्यात येणाऱ्या वडेगाव ते सिंदीपार या साडेचार किलोमीटर रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन पालकमंत्री बडोले यांनी केले. यानिमित्ताने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.सदस्य रमेश चुऱ्हे, पं.स.सदस्य इंदू परशुरामकर, गायत्री इरसे, राजेश कठाणे, सिंदीपार सरपंच जसवंता टेकाम, खोडशिवनी सरपंच अर्चना भैसारे, कोदामेडी सरपंच अनिता बडोले, वडेगाव सरपंच प्रभा बडोले, कार्यकारी अभियंता श्री.नंदनवार, श्री.ताकसांडे, नायब तहसिलदार अखिल मेश्राम यांची उपस्थिती होती.