रूग्णालयांच्या समस्यांना घेवून साखळी उपोषण

0
9

गोंदिया,दि.24- येथील कुवरतिलंकसिह जिल्हा सामान्य रूग्णालय तसेच बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयातील मुख्य समस्यांना घेवून आम आदमी पक्षाच्या वतीने १६ ऑगस्टपासून जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या समोर साखळी उपोषणाला सुरूवात करण्यात आली आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयात बंद असलेली सीटी स्कॅन मशिन त्वरित सुरू करण्यात यावे, रूग्णालयात कार्यरत वैद्यकीय अधिकाèयांची यादी बोर्डावर प्रसिद्ध करण्यात यावे, पॅथॉलॉजी उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, सोनोग्राङ्की मशिनची दुरूस्ती करण्यात यावी, अतिदक्षता विभागातील बेडची संख्या वाढविण्यात यावी याशिवाय शौचालय व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी तसेच बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात प्रसूतीसाठी येणाèया महिलांची संख्या बघता अतिर्नित बेडची व्यवस्था करण्यात यावी, एनेस्थेटिस्टची नियु्नती करण्यात यावी, रूग्णालयात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, तसेच बंद पडलेल्या धोटे सुतिका गृह पुन्हा सुरू करण्यात यावे. या मुख्य मागणीला घेवून आम आदमी पक्षाचे पुरूषोत्तम मोदी, अतुल गुप्ता, नरेंद्र गजभिये, अशोक स्नसेना, डॉ.निलेश वाजपेयी, उमेश दमाहे आदींनी साखळी उपोषणाला सुरूवात केली आहे. विशेष म्हणजे, 8 दिवस लोटूनही या उपोषणाची दखल आरोग्य विभागाने घेतली नसून जोपर्यंत आरोग्य विभाग मागण्यांची पुर्तता करणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील, अशी माहिती उपोषणकर्त्यांनी दिली आहे.