फुटपाथवरील दुकाने हटविल्याने रोजगाराचा प्रश्न उभा

0
11

गोंदिया,दि.28 :येथील शासकीय विश्रामगृहाच्या परिसरातील फुटपाथवर अतिक्रमण करुन शासकीय नोकरीअभावी काही सुशिक्षित बेरोजगारांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी स्वयंरोजगाराच्या दृष्टीने विविध प्रकारचे दुकान घातले होते. त्या दुकानांचे अतिक्रमण हटविण्यात आल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा झाल्याने दुकानांसाठी दुसर्या ठिकाणी त्वरित दुकानांचे गाळे देण्यात यावे, अशी मागणी सदर दुकानदारांसह बसपाचे शहर उपाध्यक्ष प्रशांत मेश्राम यांनी निवासी उपजिल्हाधिकार्यांना निवेदन देवून केली आहे.
निवेदनानुसार, कार्यकारी अभियंता (रोहयो) यांनी पदाचा दुरूपयोग करून बेरोजगारांच्या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले. त्यांचे स्वयंरोजगाराचे साधन शासकीय यंत्रणेद्वारे उद्वस्त केले असे निवेदनात म्हटले आहे. याच परिसरात शासनाने नवीन गाळे तयार करून त्या दुकानदारांना दिले . यावेळी बहुजन समाज पक्षाचे नेते सोनू दास, कार्यकर्ते रोहीत भारद्वाज, विशाल खंडारे, कृष्णा फरकुंडे, राजा मेश्राम, शुभम हुमणे, अतदीप मेश्राम, रितीक मेश्राम, शैलेश नांदगाये, अतुल बडोले, लोकेश भेंडारकर, जितू गजभिये, सौरभ बागडे, पप्पू नागदेवे तसेच दुकानदार मुनमुन गुप्ता, रोहीत राणा, लीमराह वसीम, सीनू श्रीनिवास आदी उपस्थित होते.