शहराच्या विकासासाठी केंद्राच्या योजना प्रभावीपणे राबविणार : खा. पटोले

0
10

गोंदिया-जिल्ह्यात गोंदिया व तिरोडा या दोन नगर परिषद आहेत. केंद्र शासनाकडून नगर पालिकेच्या विकासासाठी अनेक योजना आहेत. या माध्यमातून या दोन्ही नगर परिषदेचा येत्या काळात सर्वांगिण विकास साधणार असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले.
ते १४ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत बोलत होते. यावेळी प्रामुख्याने निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालस्कर, गोंदिया नपचे मुख्याधिकारी सुमंत मोरे, तिरोडा नपचे मुख्याधिकारी, नगरसेवक बंटी पंचबुद्धे यांच्यासह अनेक अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. खा. पटोले यांनी दोन्ही नगर परिषदेच्या मुख्याधिकाèयांशी चर्चा करताना शहरातील आरोग्य, शिक्षण व विजेच्या प्रश्न उपस्थित केले व यासाठी केंद्र शासनाकडून मोठी मदत देण्याचे आश्वासनही दिले. गोंदिया शहराची भूमिगत गटार योजना अनेक वर्षापासून मंजूर असुनही सुरू होऊ शकली नाही. या योजनेतील काही अळथळे मुंबई येथील मंत्रालयात अडकले असून या अनुषंगाने नगर विकास मंत्रालयाचे सचिव यांच्याशी चर्चा करून ही योजना त्वरीत मार्गी लावण्याचे आश्वासनही यावेळी खा. पटोलेंनी दिले. शहराच्या सौंदर्यीकरण करण्याच्या संदर्भात रेल्वे तलाव, सुभाष बगीचा याशिवाय अन्य काही ठिकाणी नविन बगीचाच्या निर्मितीबाबतही त्यांनी अधिकाèयांना सुचविले. व दोन्ही शहरांच्या विकासासाठी कोणतीही कसर सोडणार नसल्याचे ते म्हणाले.