किरण बेदी यांचा भाजपामध्ये प्रवेश

0
12

नवी दिल्ली, दि. १५ – हजारेंच्या आंदोलनातून समोर आलेल्या माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी गुरुवारी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. किरण बेदी यांना आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून पुढे आणले जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृतरीत्या प्रवेश केला. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत बेदी यांचा भाजपामध्ये प्रवेश झाला असून यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली हे सुध्दा उपस्थित होते.
किरण बेदी यांनी भाजप प्रवेश करण्यापूर्वी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्यांच्याकडून आपल्याला मोठ्या प्रमाणावर प्रेरणा मिळाल्याचे किरण बेदी म्हणाला. मी समाजिक कार्यातच जीवनभर राहण्याचे ठरवले होते. पण राजकारणात सक्रिय होण्याची प्रेरणा मला मोदींच्या नेतृत्त्व गुणामुळे मिळाल्याचे त्या म्हणाल्या.
अरविंद केजरीवाल यांच्या अत्यंत जवळच्या समजल्या जाणा-या किरण बेदी यांचे केजरीवाल यांच्याशी मतभेद झाल्यानंतर त्या भाजपामध्ये जातील असे बोलले जात होते. किरण बेदी यांनी याआधीही भाजपाचे व विशेष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतूक केले आहे. किरण बेदी यांच्या भाजपप्रवेशाने भाजपाला अजून बळकटी मिळेल असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला तर बेदी यांचे भाजपामध्ये स्वागत असल्याचे जेटली यावेळी म्हणाले.