परसवाडा : ग्राम नहरटोला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित गोंडमोहाडी केंद्राच्या क्रीडा संमेलनाचे उद््घाटन जिल्हा परिषद सदस्य डॉ. योगेंद्र भगत यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य राजलक्ष्मी तुरकर होत्या.
प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य मिना पारधी व रामलाल बाळणे उपस्थित होते. या समेलनांतर्गत घेण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद््घाटन माजी आमदार दिलीप बंसोड यांच्या हस्ते करण्यात आले. विजेत्यांना बक्षिस वितरण केंद्रप्रमुख सी.जी.मेश्राम यांच्या अध्यक्षतेत गटविकास अधिकारी एन.आर.जमईवार यांच्या हस्ते करण्यात आले.संचालन आर.पी. असाटी यांनी केले. प्रास्ताविक यू.आर.गजभिये यांनी मानले. आभार व्ही.बी. ठवकर यांनी मानले.कार्यक्रमासाठी केंद्रातील सर्वशिक्षक व नहरटोला येथील सर्व पदाधिकारी व सर्व नागरिकांनी सहकार्य केले.