सौंदड रेल्वेस्थानकाच्या समस्यांचे रेल्वेव्यवस्थापकांना निवेदन

0
13

सडक अर्जुनी,दि.07-तालुक्यातून जाणार्या गोंदिया-चंद्रपूर रेल्वेमार्गावरील सौंदड रेल्वेस्थानकातील समस्यांना घेऊन रेल्वेचे वरिष्ठ मंडळ प्रबंधक अमितकुमार अग्रवाल यांना निवेदन सादर करण्यात आले.अग्रवाल हे बल्लारशा-गोंदिया मार्गावरील रेल्वेच्या विद्युतीकरणाच्या कामाची पाहणी करण्याकरीता आले असता सौदंड येथील शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन गाड्यांचा थांब्यासह आरक्षण केंद्र सुरु करण्याबाबत चर्चा केली.यावेळी दिलेल्या निवेदनात सिकंदराबाद-दरभंगा गाडीला सौंदड येथे थांबा देणे,आरक्षण केंद्र सकाळी 8 वाजता सुरु करणे,रेल्वे स्थानकावर फुटवेयर ब्रीज तयार करणे, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर तातडीने उड्डाणपुल तयार करणे,डोंगरगढ ते नागभीड नवी शटल ट्रेन सुरु करणे,बिलासपूर-सिकंदराबाद इंटरसिटी सुरु करणे आदी मागण्यांचा समावेश होता.निवेदन देतेवेळी माजी सभापती अशोक लंजे,सौ.गायत्री इरले,टिकाराम चुटे,बबलू मारवाडे,,राकेश रहेले,राजेंद्र गुबरेले,जयप्रकाश मोदी,नंदकिशोर डोंगरवार,संजय बैस,अरविंद मेंढे,सुरेश खंतोवत उपस्थित होते.