कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांनी २२ सप्टेबरपूर्वी कागदपत्रे जमा करावी

0
10

गोंदिया,दि.२१ : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-२०१७ ही योजना शासनाने सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन कर्जमाफीचा अर्ज भरण्याची शेवटची मुदत वाढवून ती आता २२ सप्टेबर करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठीचा अर्ज  https://CSMSSY.in या संकेतस्थळावर दाखल करावयाचा आहे. तसेच ऑनलाईन अर्ज भरणा केल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी त्यांचे आधारकार्ड, असल्यास पॅनकार्ड, सातबाराचा उतारा, बँक बचतखाते क्रमांक इत्यादी कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती हया संबंधित सेवा सहकारी संस्थेच्या सचिवास देणे बंधनकारक आहे. जर ही कागदपत्रे सेवा सहकारी संस्थेच्या सचिवाकडे जमा केली नाही तर ते शेतकरी सदर कर्जमाफीच्या निकषानुसार पात्र ठरत असतील अन्यथा ते या लाभापासून वंचित राहू शकतात. पात्र शेतकऱ्यांनी या लाभापासून वंचित राहू नये यासाठी आपली वैयक्तीक माहिती कर्जमाफीसाठी लागणाऱ्या आवश्यक त्या कागदपत्रासह संस्थेच्या सचिवास २२ सप्टेबरपूर्वी सादर करावी. असे आवाहन जिल्हा उपनिबंधक संदिप जाधव यांनी केले आहे.