दुर्गम व आदिवासी भागातील जनतेला चांगली आरोग्य सेवा मिळावी -पालकमंत्री बडोले

0
13
वाढदिवसाच्या शुभेच्छा

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे लोकार्पण
गोंदिया : जिल्ह्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील जनतेला आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाèयांनी मुख्यालयी निवासी राहून चांगली आरोग्य सेवा दयावी. असे मत पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील धाबेपवनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय शिवणकर होते. प्रमुख अतिथी म्हणून खासदार नाना पटोले, जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी, माजी आमदार दयाराम कापगते, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ.संजय जयस्‍वाल, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मदन पटले, जि.प.अर्थ व बांधकाम समिती सभापती प्रकाश गहाणे, पं.स.सभापती तानेश ताराम, उपसभापती पोमेश्वर रामटेके, धाबेपवनीचे सरपंच डॉ.शैलेश भांडारकर, जि.प.सदस्य सर्वश्री मधुकर मरस्कोल्हे, अरविंद शिवणकर, उमाकांत ढेंगे, राजेश चांदेवार, पं.स.सदस्य श्रीमती बुडगेवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रवि धकाते उपस्थित होते.
पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, या परिसरातील झाशीनगर येथे बंद असलेल्या आयुर्वेदीक दवाखान्याऐवजी आता तेथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सुरु करावे. त्यामुळे त्या परिसरातील नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ घेता येईल. या भागातील वनहक्क पट्टे धारकांना पट्टे वाटप करण्यासाठी महसूल विभागाने शिबिराचे आयोजन करावे असे सांगून पालकमंत्री बडोले म्हणाले, या वनहक्क पट्टयावरील सात-बारा हा व्यक्तीच्या नांवे झाला पाहिजे. त्यामुळे त्याला विविध योजनांचा लाभ घेणे सोईचे होईल. धान उत्पादकांना आता प्रती हेक्टरी प्रोत्साहन अनुदान देण्यात यावे. झाशीनगर उपसा सिंचन योजनेचे पहिल्या टप्प्यातील काम जवळपास पूर्ण झाले असून तीन महिन्याच्या आत या भागातील शेतकèयांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार असल्याचे ते म्हणाले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना मार्गदर्शन करुन त्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी यासाठी लवकरच जिल्ह्यात शिबिराचे आयोजन करणार असल्याचे यावेळी म्हणाले.अध्यक्षस्थानावरुन विजय शिवणकर म्हणाले, जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेला आरोग्यसेवा चांगल्याप्रकारे देण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. काही अधिकारी व कर्मचाèयांची पदे रिक्त असल्यामुळे आरोग्याच्या सेवा देतांना अडचणी येत आहे. १३ वने अंतर्गत शासनाने मंजुरी दिली तर बंद असलेली दवाखाने सुरु करता येईल. तसेच आरोग्य विभागातील पदांना मान्यता मिळाली तर आरोग्य उपकेंद्रांना अधिकारी व कर्मचारी देता येईल.
प्रमुख अतिथी म्हणून खासदार नाना पटोले म्हणाले, मानवी जीवनासाठी आरोग्याच्या सेवा महत्वाच्या आहेत. जगाच्या पाठीवर आरोग्य सेवेत आपण बरेच मागे आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे की स्वस्थ भारत, आरोग्यदायी भारत असला पाहिजे. भविष्यात आधुनिक प्रकारच्या आरोग्य सुविधा पुरविण्यात येणार आहे.आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाèयांनी प्रामाणिकपणे आरोग्य सुविधा पुरवाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करुन खा.पटोले म्हणाले, आपण केंद्र सरकारच्या विविध योजना भविष्यात या भागासाठी राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आरोग्य उपसंचालक डॉ.जयसवाल, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मदन पटले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रवि धकाते, धाबेपवनीचे सरपंच शैलेश भांडारकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी पालकमंत्री बडोंले यांच्या हस्ते फित कापून नवीन इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी नवनिर्मीत इमारतीची पाहणी केली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कळमकर यांनी केले. उपस्थितांचे आभार तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय गुज्जनवार यांनी मानले.