शोभाताई फडणवीस आणि गडकरींची जुंपली

0
16

नागपूर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू आणि भाजपाच्या ज्येष्ठ आमदार शोभाताई फडणवीस यांनी टोलनाक्यांविरोधात हाती लाटणे घेतले आहे. नागपूर जिल्ह्यातील चार टोलनाक्यांवर बेकायदा वसुली सुरू असल्याचे सांगून त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला. येत्या २१ जानेवारीला आऊटर रिंग रोडवर आंदोलन करून मनसर आणि बोरखेडीचा टोलनाका बंद करू, असे त्यांनी सांगितले.
शोभाताई आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यातून विस्तव जात नाही. जुने वैमनस्य आहे. आतापर्यंत आतल्या आत धुसफूस सुरू होती. प्रथमच त्यांनी नितीन गडकरींचे नाव घेऊन तोफा डागल्या. शोभाताई म्हणाल्या, राष्ट्रीय महामार्गाच्या नियमानुसार दोन टोलनाके ४५ किलो मीटरपेक्षा कमी अंतरावर नको. पण इथे मात्र ख्वासा सीमेपासून मनसर आणि पुढे बोरखेडी मार्गावर अवघ्या ९५ किलोमीटरवर तब्बल चार टोलनाके आहेत. प्रवाशांची लूट सुरू आहे. आम्ही याबाबत गडकरी यांच्याशी चर्चा केली. टोलनाके हटवायला ते तयार आहेत. पण त्यांचा निर्णय केव्हा होईल ते माहीत नाही. म्हणून आंदोलनाद्वारे मी, आमदार मल्लिकार्जुन रेड्डी संपूर्ण?आऊटर िरग रोडच बंद पडणार आहोत.
चंद्रपूर जिल्ह्यातील तडालीचा टोलनाका बंद पाडल्यानंतर शोभाताईंनी थेट गडकरींच्या गुहेत हात घातल्याने भाजपात खळबळ उडाली आहे. ओरिएन्टल कंपनीचे हे टोलनाके आहेत. राष्ट्रीय महामार्गाचे हे प्रकरण असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यात टाग्रेट होण्याची शक्यता कमी आहे. पण आंदोलनामुळे निर्माण होणा-या कायदा आणि सुव्यवस्था परिस्थितीत पुतण्याही ओढला जाणार आहे.