मुंबई-विधान परिषदेच्या चार जागांकरिता होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेचे सुभाष देसाई, विनायक मेटे, महादेव जानकर आणि भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. चार जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज भरण्याची आज (मंगळवार) शेवटची मुदत आहे. दरम्यान, प्रत्येक जागेसाठी स्वतंत्र निवडणूक असल्याने सत्ताधारी युतीच्या चारही जागा निवडून येणार आहेत.