संविधान व आरक्षणाच्या संरक्षणासाठी एकीने लढा द्या

0
5

आरमोरी,दि.25-खाजगीकरण, उदारिकरण व भांडवलशाहीमुळे संविधानाने दिलेले आरक्षण संपविण्याचा विद्यमाने सरकारचा डाव असून त्यामुळे नोकरभरतीवरही बंद सुरू आहे. बहुमताच्या जोरावर संविधान व आरक्षणावर घाव घालण्याचा प्रयत्न सरकार चालविलेला आहे. त्यामुळे संविधान व आरक्षणाच्या रक्षणासाठी आत्मभाव व स्वाभीमान जागृत करून एकीने लद्या द्यावा, असे आवाहन आदिवासी साहित्यिक तथा विचारवंत प्रभू राजगडकर यांनी केले.
सम्यक फाऊंडरेशन शाखा आरमोरीच्यावतीने आज आरमोरी येथील डॉ.आंबेडकर विद्यालयात ‘संविधान व आरक्षण बचाव’ परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेवेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. महेश कोपूलवार होते. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार तथा भारिप बहुजन महासंघाचे प्रदेश निरीक्षक रोहिदास राऊत, सामाजिक कार्यकर्ते हिरालाल येरमे, माजी सरपंच शालीक पत्रे, हंसराज बडोले, व्ही.जी. शेंडे, भारीप बहुजन महासघाचे तालुकाध्यक्ष भिमराव ढव आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. महेश कोपुलवार म्हणाले, देशाची खरी सत्ता कार्पोरेट व भांडवलदाराच्या हाती आहे. संविधान व आरक्षण धोक्यात आले आहे. लोकशाही स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे. संविधान वाचले तर आरक्षण वाचेल. त्यामुळे व्यवस्थेविरोधात लढा देण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन केले. यावेळी रोहिदास राऊत, हिरालाल येरमे, हंसराज बडोले, शालीक पत्रे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक व्ही. जी. शेंडे , संचालन रवींद्र नैताम तर आभार कुमता मेश्राम यांनी मानले.