बीएएमएस डॉक्टरांचा लक्षवेधी मोर्चा

0
8

भंडारा,दि.07 : आरोग्य योजनेअंतर्गत एनसीआयएसएम बिल २०१७ केंद्र शासनाच्या वतीने नवीन बिल काढण्यात येत आहे. यात सदर बिल रद्द करावा अन्यथा त्यात सुधारणा करावी या मागणीसाठी जिल्ह्यातील बीएएमएस डॉक्टरांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यात पंतप्रधानांना जिल्हाधिकाºयांमार्फत निवेदन देण्यात आले.
बीएएमएस डॉक्टर संघटना (निमा) अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील डॉक्टरांनी खाजगी दवाखाने व रुग्णालये शुक्रवारी बंद ठेवली होती. तसेच शासकीय, निमशासकीय, १०८ क्रमांकावरील अ‍ॅम्बुलन्स सेवेतील वैद्यकिय अधिकारी यांनीही या बंदमध्ये सहभाग नोंदविला. दरम्यान शुक्रवारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी मोर्चा काढला.आरोग्य सेवेतही बीएएमएस डॉक्टरांचा ९० टक्के सहभाग आहे. अशास्थितीत अविरत सेवा देवूनही केंद्र शासनाच्या वतीने काढण्यात येणाºया बिलामध्ये नविन नियम डॉक्टरांसाठी त्रासदायक ठरणार आहेत. निवेदन देताना निमा संघटनेंतर्गत सातही तालुक्यातील पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.