ओबीसी सेवा संघाचे ८ वे राज्य अधिवेशन पापळ(अमरावती)येथे

0
20

अकोला,दि.०९-ओबीसी सेवा संघ अकोला आयोजित प्रचार प्रसार सभेत १० डिसेंबर रोजी पापळ अमरावती येथे होणाèया ८ व्या राज्य अधिवेशनाबद्दल सेवा संघाचे महासचिव नरेंद्र गद्रे यांनी माहिती देत प्रचार प्रसारावर भर दिला.या बैठकीचे आयोजन जिल्हाध्यक्ष रमेश धुळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी गजानन कपीले,केंद्रीय सदस्य महेंद्र धावडे,संताजी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देडवे,शिक्षक संघटनेचे प्रशांत उबंरकर,तेला समाज शाखेचे दिलीप हांडे आदी मान्यवर उपस्थित होते.भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या जन्मगावी आयोजित या राज्य अधिवेशनात विविध विषयावर चर्चा होणार आहे.सोबतच ओबीसीवर सातत्याने सध्याच्या सरकारकडून सूरू असलेल्या अन्यायाची माहिती दिली जाणार असल्याने ओबींसींना मोठ्या संख्येने राज्य अधीवेशनास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.