दिवाळीपुर्वीच तुमसर पालिकेच्या कर्मचार्यांना बोनस

0
10

तुमसर ,दि.12- नगरपरिषद या स्वायत्त संस्थेत नेहमीच निधी अभावी कर्मचार्‍यांचे वेतन थकीत असल्याची ओरड असते. परंतु, याला तुमसर नगरपरिषद अपवाद ठरली असून दिवाळीपुर्वीच सर्व कर्मचार व पेंशनर्सना वेतनासह बोनस देऊन दिवाळी प्रकाशमय करण्याची किमया नगराध्यक्ष इंजि. प्रदिप पडोळे यांनी करीत इतिहासच रचला आहे.
देशात दिवाळी सणाला प्रचंड महत्त्व असून गरिबांपासून तर श्रीमंतांनाही या सणाचे आकर्षण असते. बहुतांश नगर परिषदेत निधीचा ठणठणाट असल्याने कर्मचार्‍यांचे तर कधी नियमित वेतन होत नाही. त्याचबरोबर सेवानवृत्तांना हक्काची संपूर्ण रक्कम दिली जात नाही. क्षुल्लक रक्कम देऊन त्यांची बोळवण केली जाते. तुमसर न. प.ची धुरा नगराध्यक्षप्रदिप पडोळे यांनी सांभाळताच मुख्याधिकारी अर्चन मेंढे यांच्याशी समन्वय साधून सर्व प्रथम सेवानवृत्तकर्मचार्‍यांचे नवृत्तीनंतरचे लाभ आणि इतर देणे मिळून आतापर्यंत जवळपास १ कोटी ५0 लाख रुपये कर्मचार्‍यांना दिलेले आहेत. त्याच पार्श्‍वभूमीवर नगराध्यक्षांनी दिवाळीपुर्वी कर्मचार्‍यांचे वेतन ८१ लाख १८ हजार ३४८ रुपये त्यात सेवानवृत्त कर्मचार्‍यांचे २१ लाख ६ हजार ४६0 रुपये तर प्राथमिक शिक्षण विभागातील कर्मचार्‍यांच्या १0 टक्के वेतनाची ९ लाख ५0 हजार रुपये तसेच आतापर्यंत न दिलेल्या सहाव्या वेतन आयोगाची थकीत ११ लाख ९५ हजार रुपये अतिरिक्त वेतनस्वरूपात कर्मचार्‍यांना देणयत आल्याने कर्मचर्‍यांची दिवाळी प्रकाशमय झाली आहे.