‘लढा अंधर्शद्धा निर्मूलनाचा’ मासिकाचे प्रकाशन

0
11

साकोली,दि.12-येथील डी. जी. रंगारी यांच्या निवासस्थानातील कार्यालयात लढा अंधर्शद्धा निर्मूलनाचा या मासिकाचे भंडारा- गोंदिया जिल्ह्यातील अभाअंनिसचे समन्वयक डॉ. प्रकाश धोटे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.यावेळी धोटे म्हणाले, मासिकाचे मुख्य संपादक प्रा. श्याम मानव असून सदर मासिक वाचनीय व विज्ञानावर, वैज्ञानिक दृष्टीकोणावर आधारित असून कित्येक अंधर्शद्धेवर घडलेल्या घटनांचा उहापोह या अंकात करण्यात येतो. यावेळी जिल्ह्यातील अभाअंनिसचे उपाध्यक्षडी. जी. रंगारी, तालुका अध्यक्षप्रा. बहेकार, मुख्याध्यापक एम. टी. रामटेके, विद्या रंगारी, मंदा रामटेके, आरती रंगारी, यशवंत उपरीकर, कागदराव रंगारी व कार्यकर्ते उपस्थित होते.