लाखनी येथे कुणबी समाज मंडळाचा कोजागिरी कार्यक्रम

0
12

लाखनी,दि.12-समाजाने आपल्याला घडवलं आहे,समाजाप्रति आपलं काही देणं लागतं म्हणून आपल्या समाजातील लोकांनी समाजकार्यात रस घेतला पाहिजे. सामाजिक कार्यक्रमांमुळे सर्व समाजबांधव एकत्र येतात, मन जुळतात पर्यायाने समाज वृद्धिंगत होतो म्हणून कोजागिरी सारख्या कार्यक्रमाचे आयोजन केले पाहिजे, असे प्रतिपादन दादासाहेब टिचकुले यांनी केले. ते कुणबी समाज मंडळ लाखनीद्वारे आयोजित शरद पौर्णिमा अर्थात कोजागिरी कार्यक्रमात बोलत होते. कोजागिरीचा कार्यक्रम पंरपरेनुसार कुणबी समाज सभागृह लाखनी येथे पार पडला. शरद पोर्णिमा कार्यक्रमाला लॉर्ड कृष्णा संगीत समुहाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने बहार आणली व उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. दादासाहेब टिचकुले तर उद्घाटक म्हणून माजी जि.प.सदस्य राजेशजी बांते उपस्थित होते. आणि प्रमुख अतिथी म्हणून तालुका कृषी अधिकारी पद्माकरजी गिदमारे होते. सन्माननीय अतिथिंच्या हस्ते तुकाराम महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून सांस्कृतिक कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.  याप्रसंगी
उद्घाटक राजेशजी बांते यांनी सर्वांना शरद पौर्णिमा आणि दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. पद्माकर गिदमारे यांनी उपस्थित समाजबांधवांना शेतिविषयक माहिती देत फवारणी करताना घ्यायची काळजी, शासनाच्या योजना यावर मार्गदर्शन केले.
संचालन युवा समिती सहसचिव प्रशांत वाघाये व आभार प्रदर्शन युवा समिती अध्यक्ष उमेश सिंगनजुडे यांनी केले. कार्यक्रमाला उमराव आठोडे, रामदास सार्वे, माधवराव भोयर, गंगाधर लुटे, परसराम फेंडरकर, मधु मोहतुरे, संजय वनवे, ओमप्रकाश शेंडे,  बालू फसाटे, अर्चना ढेंगे,  नितेश टिचकुले, मनोज ईश्वरकर, मंगेश धांडे तसेच सर्व समाजबांधवांचे सहकार्य लाभले.