तर लोकप्रतिनिधींना गावबंदी करू – आमगाव खुर्द ग्राम वासियांचा इशारा

0
17

सालेकसा,दि.28- आमगाव खुर्द ग्राम पंचायत, सालेकसा नगर पंचायत विलीनीकरण मुद्दा टोकाला पोचला असून जर आमगाव खुर्दला नगर पंचायत मध्ये सामाविष्ठ केले गेले नाही. तर लोकप्रतिनिधींना गावात येण्यास बंधन घालू अश्या शब्दात आमगाव खुर्द वासियांनी पत्रकार परिषदेत सांगितले. हि पत्रकार परिषद शासकीय विश्रामगृह सालेकसा येथे आयोजित केली होती. आमगाव खुर्द ग्राम पंचायत सालेकसा नगर पंचायत मध्ये सामील व्हावे याकरिता न्यायालयीन प्रक्रिया, संपूर्ण गाव बंद आणि ग्राम पंचायत निवडणुकीवर बहिष्कार अश्या विविध प्रकारे आधी पण गावकर्यांनी प्रशासनाविरुद्ध आपला रोष व्यक्त केला आहे. उच्च न्यायालयाचा आदेश असतांना आमगाव खुर्द ग्राम पंचायत अजून पण का सालेकसा नगर पंचायत मध्ये विलीन केले जात नाही,याचे रहस्य उलगडत नसल्याने आमगाव खुर्द वासियांचे त्रास वाढत चालेले आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार आणि खासदारांनी ह्याकडे तातडीने लक्ष देऊन हा तोडगा सोडवायला हवा होता. मात्र तसे न करता फक्त वेळकाढूपणा करत असल्याचे त्यांचा भूमिकेवरून दिसत आहे. आधी आमगाव खुर्द ग्राम पंचायत सालेकसा नगर पंचायत मध्ये विलीन करा नंतरच निवडणूक घ्या अशी मागणी ह्या पत्रकार परिषदेतून करण्यात आली.

स्थानिक आमदारांच्या २०१५ मधील असम्मती पत्रामुळेच हे वाद चिघळला आणि मागील ३ वर्षापासून ह्या वादाला गावकरी सामोरे जात असून ६ हजार नागरिकांना ह्याचा भुर्दंड भरावा लागत आहे. न्यायालयाची दिशाभूल करून चुकीची माहिती शासनाला स्थानिक प्रतीनिधींनी पुरवून ह्या वादाला निर्मिती केली आहे ज्यामुळे आज आमगाव खुर्द विरुद्ध सालेकसा ग्रामवासी असे चित्र निर्माण झाले आहे. स्थानिक प्रतिनिधींनी वारंवार उल्लेख केलेली बाब म्हणजे आधी आमगाव खुर्द ग्राम पंचायतचे नगर पंचायत मध्ये विलीनीकरण साठी विरोध होते, मात्र असले कुठलेही पत्र ग्राम पंचायातने पाठवले नाही, असेही ह्या पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले. आमगाव नगर परिषद तयार करताना त्यात ८ ग्राम पंचायतीचा समाविष्ट करण्यात आले होते. आणि महत्वाची बाब म्हणजे ८ पैकी ४ ग्राम पंचायतीचे नगर परिषदेत सहभागी करु नये म्हणून संबंधित ग्राम पंचायतीचे आमसभेचा निर्णय असून सुद्धा त्या चारही ग्राम पंचायतीना सहभागी करण्यात आले.याउलट आमगाव खुर्द ग्राम पंचायतला सालेकसा नगर पंचायत मध्ये सामील करावे म्हणून आमसभेचे ठराव असतांना ते का केले गेले नाही असा सवाल लोकप्रतिनिधीकडे ह्या पत्रकार परिषदेमार्फत केला गेला. काही दिवसांनी सार्वत्रिक नागप पंचायतचे निवडणुका लागणार असून सालेकसा नगर पंचायत सुद्धा त्यासाठी सज्ज होणार आणि प्रशासन व्यस्थ होणार असून आचार साहिंता काही दिवसांवर असून आमगाव खुर्दचा विषय मात्र जैसे थे स्थितीत आहे. हे चित्र जर असेच राहिले तर आमदार आणि खासदारांचे गावातील सर्व दौरे रद्द पाडून गावबंदीच नाही तर तालुकाबंदी करू अशा इशारा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून गावकर्यांनी दिला. वारंवार निवेदन करून सामाजिक संस्था, राजकीय पक्ष आणि गावकर्यांनी ह्यांना मात्र निराशाच मिळाली.