नोपार्कींग फलकाजवळ वाहनांची पार्कीग

0
8

गोरेगाव,दि.28:- येथील तहसिल कार्यालयाच्या प्रवेश दाराजवळ मोठ्या प्रमाणात वाहनांची पार्कींग होत असल्याने यावर आळा घालण्यासाठी तहसिलदारांनी नोपार्किगंचे फलक लावुन घेतले. पण येणा-या वाहनाना कोठे ठेवण्यात यावे असे फलक लावले नसल्याने वाहनचालक नोपार्कींग फलकाजवळच आपले वाहन पार्क करीत असल्याचे चित्र गोरेगाव तहसिल कार्यालयात बघावयास मिळते.पार्कींग व्यवस्था करण्यात आली नसल्याने कामानिमीत्त येणा-यांना प्रवेशदाराजवळ वाहन ठेवणे सोयीस्कर होत असल्यानेच नोपार्कींगच्या फलका शेजारीच अधिकारी, कर्मचारीही आपले वाहने पार्क करीत असल्याने नागरीकामध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.