जि.प. अध्यक्षासह पदाधिकारी-अधिकार्याना निवासस्थाचे वाटप, घरभाडे भत्ते बंद

0
9

गोंदिया,दि.08-भंडारा जिल्ह्यापासून स्वतंत्र गोंदिया जिल्हा परिषद निर्माण करण्यात आली.तेव्हापासूनच जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीसोबतच अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या निवासस्थानाचे बांधकामही करण्यात आले.जिल्हा परिषदेचा कामकाज सुरळीत सुरू झाला.परंतु गेल्या १७ वर्षाचा काळ लोटला परंतु एकही जिल्हा परिषदेचा पदाधिकारी शासकीय निवास्थानात आजपर्यंत राहायला गेला नाही.
पदाधिकारी शासकीय निवासस्थानात न राहता भाड्याच्या घरात राहून घरभाड्याची उचल करीत असल्याचे वृत्त एकमेव बेरार टाईम्सने सातत्याने प्रशासनाच्या लक्षात आणून देण्याचेे काम केले. पदाधिकार्यांच्या निवासस्थानाच्या बांधकामापासून दुरुस्तीपर्यंत सर्व गोष्टीवर लक्ष ठेवत पदाधिकार्यांनी व इतर अधिकार्यानी सीईओप्रमाणे शासकीय निवासस्थानात राहावे यासाठी वृत्ताच्या माध्यमातून केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून १ नोव्हेंबरपासून जि.प. अध्यक्षासह सर्व पदाधिकारी व सर्व विभाग प्रमुख असलेल्या अधिकार्यांना शासकीय निवासस्थानाचे वितरण करुन घरभाडे भत्ते बंद करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षांचा बंगल्यासह पदाधिकारी यांच्यासाठी एकाच टाईपमध्ये तयार करण्यात आलेले ४ निवासस्थान तयार करण्यात आली आहेत. सोबतच समाज कल्याण सभापती यांना मुख्य लेखा वित्त अधिकारी, उपमुकाअ, कार्याकारी अभियंता यांना वितरीत करण्यात आलेल्या निवासस्थानाच्या रांगेत निवासस्थान उपलब्ध करुन देण्यात आले असून अधिकार्यानी राहणे सुरु केले आहे. तर अध्यक्ष आपल्या नवीन बंगल्यात जाण्यासाठी आतूर असून गृहप्रवेशाचा मुहूर्त कधी काढतात याकडे लक्ष लागले आहे.
पदाधिकार्यापुर्वी वर्ग ४ च्या कर्मचार्याना निवासस्थान वितरीत करण्यात आले असून त्यांनीही राहणे सुरु केले आहे. आता शासकीय निवासस्थान मिळाल्ङ्माने व घर भाडे भत्ते बंद झाल्याने पदाधिकारी जानेवारी २०१८ मध्ये आपला कार्यकाळ संपण्यापुर्वी शासकीय निवासस्थानात जावून त्यानंतर येणार्या पदाधिकार्यासाठी शासकीय निवासस्थानी राहण्याचा पायंडा घालून देतात की दोन महिने वेळ मारुन नेतात याकडे लक्ष लागले आहे.