जिल्हा परिषदेच्या स्थायी सभेत दुष्काळीपरिस्थितीसह सर्वेक्षणावर चर्चा

0
9

गोंदिया,दि.०८: -गोंदिया जिल्हा परिषदेच्या स्व.वसंतराव नाईक सभागृहात मंगळवारला पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभेत जिल्ह्याती दुष्काळी परिस्थितीवर सत्ताधारी पक्षातील सदस्यासंह विरोधी पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्यांनी चर्चा करीत जिल्हा दुष्काळग्रस्त जाहिर करण्यात यावा यासंबधीचा ठराव शासनाकडे पाठवावे तसेच शेतकèयांना आर्थिक मदतीसह खरीप हंगामासाठी कमी पाण्यात निघणारी बियाणे उपलब्ध करुन देण्यावर चर्चा करण्यात आली.
तर आज बुधवारला होणाèया सर्वसाधारण सभेकडेही लक्ष असून शिक्षण विभागातील श्री खोब्रागडे यांच्यावर गंभीर आरोप असल्याने त्यांना सामान्य प्रशासन विभागात कुठल्या निर्णयाद्वारे नियुक्त करण्यात आली,यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.सोबतच जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांच्या नावे कामावर नसलेल्या पंधरे नामक अंगणवाडी सेविकेने पत्र पाठवून केलेल्या आरोपाबद्दलही चर्चा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा उषा मेंढे होत्या.यावेळी उपाध्यक्ष रचना गहाणे, सभापती पी.जी.कटरे,देवराज वडगाये ,जिल्हा परिषद सदस्य सुरेश हर्ष ,रमेश अंबुले, गंगाधर परशुरामकर, राजलक्ष्मी तुरकर, रजनी सोयाम,शोभेलाल कटरे यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.सभेमध्ये गोंदिया ,गोरेगाव व तिरोडा तालुक्यात जाहिर करण्यात आलेल्या मध्यम दुष्काळाबाबतची व्याख्या कृषी अधिकाèयांना विचारण्यात आली असता सदस्यांना मध्यम दुष्काळाबाबत कृषी अधिकारी माहितीच देऊ शकले नाही.
यासोबतच अंगणवाडी भरतीवरील प्रकियेसंबधात काय अडचणी होत्या व त्यातील त्रुट्या दूर करण्यात आल्या का याबाबतही विचारणा केली असता सभापती नसल्याने त्यावर सविस्तर चर्चाच होऊ शकली नाही,मात्र त्रुट्या दूर करण्यात आल्याची माहिती अधिकाèयानी देऊन वेळ मारुन नेली.
त्याचप्रमाणे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत घरकुल देण्यासाठी जे काही निकष ठरवून लाभार्थी यादी तयार करण्यात आल्या,त्यामध्ये अनेक त्रुट्या असल्याने ती यादी नव्याने ग्रामसभेच्या माध्यमातून तयार करुन गरजूनां उपलब्ध करुन देण्यावर चर्चा करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य रमेश अंबुले यांनी दिली.