धनादेशावर बोगस स्वाक्षरी करून ग्रामसेवकाने केली उचल

0
10

गोरेगाव : तालुक्यातील चिल्हाटी येथील तत्कालीन ग्रामसेवक एच.आर. शहारे यांनी ग्रामीण पाणी पुरवठा समिती, महात्मा गांधी तंटामुक्त समिती व मागासक्षेत्र विकास निधीमधून स्वत:च्या नावे परस्पर निधी काढून स्वत:च्या कामात खर्च केले, अशी तक्रार चिल्हाटीचे सरपंच देवराम रहांगडाले यांनी उपमुख्य कार्यपालन अधिकारी गोंदिया, खंडविकास अधिकारी गोरेगाव यांना केली आहे.

चिल्हाटीचे सरपंच देवराम रहांगडाले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तत्कालीन ग्रामसेवक एच.आर.शहारे यांनी धनादेशावर बोगस स्वाक्षरी करून ग्राम पंचायतच्या विविध फंडातील पैसे विड्राल करून स्वत:च्या कामात खर्च केले व काही दिवसानंतर विड्राल केलेली संपूर्ण रक्कम परत ग्रामपंचायत जमा खातेमध्ये जमा केले.

सदर प्रकरण ग्रामपंचायतच्या लक्षात आल्यावर ग्रामपंचायत प्रशासनाने चौकशी केली असता सदर प्रकार लक्षात आला. ग्रामसेवकाने जवळपास ५ लाख ५० हजार रुपये काढून स्वत:च्या कामात खर्ची केल्याचे व परत एक वर्षाच्या कालावधीत काढलेली संपूर्ण रक्कम जमा केल्याची तक्रार सरपंच देवराम रहांगडाले यांनी केली आहे.

सदर प्रकरणाची चौकशी करून तत्कालीन ग्रामसेवक एच.आर. शहारे यांच्यावर कारवाईची मागणी सरपंचासह गावकऱ्यांनी केली आहे. यावर वरिष्ठांनी कोणतीही कारवाई केली नाही