गोंदिया नगर पालिकेला ४५ कोटींचा निधी

0
21
गोंदिया ,दि.१५ः: गोंदिया शहराचा सर्वांगिण विकास व नागरी सुविधांच्या पुर्ततेकरिता आराखडा तयार करून नगर अध्यक्ष अशोकराव इंगळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ९ नोव्हेंबर रोजी वर्षा निवासस्थानी भेट घेतली. त्याकरतिा ४५ कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक निर्णय घेत ४५ कोटी रुपयांचा निधी तत्काळ प्रभावाने मंजूर करण्याची सूचना संबंधीत विभागांना केली.
गोंदिया शहर व लगतच्या परिसरात कोणतेही मोठे प्रकल्प विंâवा उद्योग नाहीत. अथवा येथे उद्योग सुरू करण्यासाठी उद्योगपती पुढे येत नाही. त्याचा परिणाम नगरपालिकेच्या आर्थिक उत्पन्नावर होत आहे. नगर पालिकेचे स्वतचे उत्पन्न अतिशय कमी अशल्यामुळे नगर परिषद स्वनिधीतून कोणतेही शहर विकासाचे काम करू शकत नाही. शहर विकास व नागरी सुविधा पुरविण्यासाठी शासनाचा निधी आवश्यक आहे. त्यामुळे नगर अध्यक्ष अशोक इंगळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथील वर्षा बंगल्यावर ९ नोव्हेंबर रोजी भेट घेतली. दरम्यान विविध विकासकामांचा आराखडा अशोक इंगळे यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केला. त्यात शहरातील प्रमुख रस्त्यांची दुरुस्ती व देखभाल तसेच नवीन रस्ते बांधकामाकरिता २५ कोटी रुपयांची मागणी विशेष रस्ता अनुदान या योजनेतून केली. तसेच शहरात अस्तित्वात असलेल्या उद्यांनांचे नुतनीकरण करणे, शहरातील मंजूर ले आऊटमधील मोकळ्या जागांमध्ये चिल्ड्रेन पार्वâ, जीम,वृक्षारोपण, सौंदर्यिकरण अशा अनेक योजना विशेष अनुदान वैशिष्टयपुर्ण अनुदानातून १० कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला. नगर पालिकेच्या विकासाकरिता निधी कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोंदिया पालिकेचे अध्यक्ष अशोक इंगळे यांना दिले. यावेळी भाजपचे जिल्हा सचिव अमृत इंगळे उपस्थित