25.2 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home विदर्भ ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे कार्य कौतुकास्पद

ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे कार्य कौतुकास्पद

0
47
 लाखनी,दि.१५ः- गेली १५ वर्ष पक्षी निरीक्षण, पर्यावरणस्नेही किल्ले बनवने स्पर्धा अशी स्तुत्य उपक्रम घेऊन निसर्गप्रेम वाढविण्याचे कार्य जे अविरतपने केले ते निश्चित कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन स्वप्नपूर्ती फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत वाघाये यांनी केले. ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब आणि स्वप्नपूर्ती फाउंडेशन लाखनी यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणस्नेही किल्ले बनवने स्पर्धा व डॉ.सलीम अली यांच्या जयंतीचे औचित्य साधुन पक्षी निरीक्षण आणि विविध स्पर्धेचे बक्षिस वितरण कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मंचावर अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त प्राचार्य छबिलाल रहांगडाले, ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे संयोजक प्रा.अशोकराव गायधने, स्वप्नपूर्ती फाउंडेशनचे सचिव सुधीर काळे, दिलीप भैसारे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुधीर काळे म्हणाले की निसर्गाप्रती प्रेम वाटावं यासाठी प्रयत्न करणारे ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे कार्य कौतुकास्पद आणि तेवढेच प्रेरणादायी आहे.
यावेळी विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण तथा पक्षीमित्रांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित सर्व अतिथिंनी विजयी स्पर्धकांचे अभिनंदन केले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अशोक गायधने यांनी तर सूत्रसंचालन तथा आभार श्री. वैद्य यांनी केले.