30.1 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ आग लागल्याने घरातील दहा क्विंटल कापूस जळाला

आग लागल्याने घरातील दहा क्विंटल कापूस जळाला

0
26

चंद्रपूर,दि.03 – गोंडपिपरी य़ेथील एका शेतकऱ्याच्या घराला लागलेल्या आगीत दहा क्विंटल कापूस जळून खाक झाला. आग लागल्याचे लवकरच लक्षात आल्याने अनर्थ टळला. घरात जवळपास चाळीस क्विंटल कापूस होता. तालुक्यातील धाबा येथील आज ही घटना घडली.

धाबा येथील छत्रपती संगोकार, चंद्रकांत संगोकार यांना यंदा चाळीस क्विंटल कापूस झाला. दोघांनीही एकाच ठिकाणी कापूस ठेवला. आज मात्र घराला आग लागली. बघताबघता आगीने पसरत गेली. घरात गॅस सिंलेडर असल्याने आग विझवण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नव्हतं. ठाणेदार जिवन लाकडे यांना यासंदर्भातील माहिती देण्यात आली. तोपर्यंत दोन तरूणांनी घराचा दरवाजा तोडून सिंलेडर बाहेर काढला. ठाणेदार आल्यानंतर नागरिकांच्या मदतीने आग विझविण्यात आली. जवळपास दहा क्विंटल कापूस जळून खाक झाला असून घराचाही काही भाग जळाला आहे.