अवैध वाळू बंदीसाठी गाव समिती स्थापन करा-ठाणेदार पर्वते

0
14

सडक अर्जुनी,दि.१३: येथील मुरदोली नदी घाटावरुन तसेच इतर गावशेजारील घाटावरुन वाळूची होत असलेली अवैध वाहतूक रोखण्यासाठी गावकèयांनीच गाव समिती गठित करुन त्यावर आळा घालावे असे आवाहन डुग्गीपार पोलीस ठाण्याचे ठाणेदार किशोर पर्वते यांनी केले. ते ११ डिसेंबर रोजी सौन्दड परिसरातील पिपरी /राका गट ग्रामपंचायत असलेल्या गावामध्ये आयोजित गावकèयांच्या सभेत बोलत होते.
गावातील नागरिकांना अवैधरित्या होत असलेल्या वाहतुकीला आळा कसा घालता येईल. या अवैध वाळू उपसामुळे पर्यावरणावर काय दुष्टपरिणाम होतो यावर माहिती देत गावकèयांनीच याकडे लक्ष दिल्यास पर्यावरणाचा होणारा èहास थांबण्यास व अवैध वाळू उपसावर निर्बंध आणण्यात मदत होईल असे सांगितले.यावेळी सरपंच सो,रेखाताई सुरेशजी चांदेवार, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष शंकरजी मेंढे, बी.बी.चंदेल, सुखदेव कोरे यांनी ही मार्गदर्शन केले.यावेळी गावकèयांनी वाळूचा होणारा अवैध उपसा आणि भरधाव वेगाने जाणाèया वाळूंच्या वाहनावर गावबंदीसह दंड वसूल करण्याचा निर्णय सर्व संमतीने घेतला.