सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणणाèयावर कठोर कारवाई करा

0
16

तिरोडा,दि.१३: गेल्या साठ वर्षात गाव बदलले. मात्र आपल्यात अद्याप बदल झाला नाही. साठ वर्षापुर्वी आपण उघड्यावर संडासला जात होतो. आताही तेच सुरु आहे. उघड्यावर संडासला गेल्यामुळे इतरांचे आरोग्य धोक्यात येते. अशाप्रकारे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणण्याचा कुणालाही अधिकार नाही. असे मत व्यक्त करुन सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणणाèयावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा परिषद गोंदियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर.एच.ठाकरे यांनी दिले.
ुतिरोडा तालुक्यातील सरांडी, सुकडी (डाक), चांदोरी या ग्रामपंचायतीमध्ये गुडमार्निग पथकाने धडक दिली. त्याप्रसंगी चांदोरी येथे आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. जिल्हा परिषद सदस्य कैलास पटले, सरपंच अल्पेश मिश्रा, जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.व्ही. राठोड, गटविकास अधिकारी जावेद इनामदार, तहसीलदार रामटेके, हुपराज जमईवार, ग्रामपंचायत सदस्य यावेळी उपस्थित होते. आपल्या गावाला सुंदर, स्वच्छ करायचे असेल तर गावातील गिनरानी समितीने पुढाकार घ्यावा, चांगल्या कामासाठी महसूल प्रशासन, विकास प्रशासन आपल्या पाठीशी राहिल. असे सांगून गावकèयांनी ग्रामसभेमध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन ही त्यांनी याप्रसंगी केले. जिलह्यात मोठ्या प्रमाणात घरकुलाचे बांधकाम होणार आहे. त्यासाठी गवंड्यांची मोठ्या प्रमाणात गरज भासणार आहे. त्या दृष्टीने गवंड्याचे प्रशिक्षण आयोजित करण्यावर, बुरड कामगारांच्या कौशल्यावर देखील भर देण्याचे सुतोवाच उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.व्ही.राठोड यांनी केले. पहाटे पाच वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी आर.एच. ठाकरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.व्ही.राठोड, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जावेद इनामदार, गटशिक्षणाधिकारी समरीत, विस्तार अधिकारी धारगावे, एस.एस. निमजे, सी.एच. गौतम, पंचायत समिती तिरोड्याचे अधिकारी व कर्मचारी सरांडी येथे पोहोचले. दरम्यान गावात गृहभेटी करण्यात आल्य. शाळेला भेटी देवून लोकांच्या समस्या सुद्धा ऐकूण घेण्यात आल्या. याप्रसंगी डोमा किसन कांबळी, मुन्ना झेलकर यांच्याकडे वैयक्तीक शौचालय बांधकामाचे उद्घाटन करुन बांधकामाला सुरुवात करण्यात आली.मुकाअ ठाकरे यांच्या प्रबोधनानंतर गावातील शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोŸक पाटील, दिनेश पटले यांनी यापुढे खर्रा खाणार नसल्याचा प्रण केला. सरपंच माणिकराव वाणी, उपसरपंच अरqवद कांबळी, मुख्याध्यापक येळे, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, शिक्षक व गावकरी याप्रसंगी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.