28.1 C
Gondiā
Saturday, August 15, 2026
Home विदर्भ आ.रवी राणाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

आ.रवी राणाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

0
15

नागपूर,दि.14ः- बडनेराचे  आमदार रवि राणा व युवा स्वाभिमान पार्टी च्या पदाधिकाऱ्यांनी नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निसर्गाच्या लहरीपणामुळे अमरावती जिल्यातील शेतकयांच्या शेतातील पिके नष्ट झाल्यामुळे  उप्तादनात घट आल्याने व कापूस पिकावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्यात यावे या मागणीचे निवेदन सादर केले.त्या निवेदनात शासनाने मान्यता दिलेली कापूस बियाणे निकृष्ट दर्जाची होती.त्यामुळे उप्तादन क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात घट आली आहे,अशा सर्व निकृष्ट दर्जाची बियाणे तयार करणाऱ्या व शेतकऱ्यांची फसवणूक करून कर्जाच्या दरीत लोटणाऱ्या बियाणे कंपन्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्या कंपन्यांकडून नुकसान भरपाई वसूल करण्यात यावे अशी मागणी केली आहे.मुख्यमंत्री यांनी सदर प्रकरणात चौकशी करण्याचे आश्वासन आ.राणा यांना दिले आहे.