गडचिरोली,दि.14 : गोंडवाना विद्यापीठाच्या विविध समित्या व अभ्यास मंडळाच्या रविवारी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी बुधवार दि.१३ ला सुरू झाली. मात्र सायंकाळपर्यंत एकाही जागेचा निकाल जाहीर होऊ शकला नाही. विशेष म्हणजे पसंतीक्रमानुसार मतदान करायचे असल्यामुळे बºयाच मतदारांनी चुकीच्या पद्धतीने मतदान केल्याने त्यांचे मत बाद ठरविण्यात आले. आज सकाळपर्यंत मतमोजणी सुरु असून शिक्षक महाआघाडीने सर्वच जांगावर आघाडी घेतली आहे.10 पैकी 8 जागांचे निकाल लागले असून 7 जागांवर शिक्षक आघाडीने विजय मिळविला.शिक्षक महाआघाडीने महिला राखीव गटातून संध्या शेषराव येेलेकर,ओबीसी गटातून सुनिल एस.शेरकी,एनटी गटातून अजय बत्कमवार,एससी गटातून दिपक धोपटे, अजय लोंढे,अडॅ.गोविंद भेंडारकर,डाॅ.प्रशांत ठाकरे हे विजयी झाले आहेत.तर अभाविप व शिक्षण मंच पॅनलकडून प्रशांत दोंतुलवार,अनु.जमाती गटातून तनुक्षीताई आञाम व प्राचार्य देविदास चिलबुले हे विजयी झाले आहेत.
प्राचार्य गटात यंग टिचर्स असोसिएशनचे प्राचार्य डॉ.कीर्तीवर्धन दीक्षित, डॉ.विवेक शिंदे व प्राचार्य डॉ.एन.एस लडके विजयी झाले. सेक्युलर महाआघाडीचे डॉ.दिलीप जयस्वाल हेही निवडून आले. या आघाडीचे प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे, प्राचार्य डॉ.लालसिंग खालसा व प्राचार्य डॉ.सिंग हे आधीच बिनविरोध विजयी झाले होते. व्यवस्थापन प्रतिनिधी गटात गटात केवळ ९० मते होती. त्यातील आठपैकी चार उमेदवारांना निवडून द्यावयाचे होते. यात खुल्या प्रवर्गातून शिक्षण मंचचे मोतीलाल कुकरेजा निवडून आले. अनुसूचित जाती प्रवर्गातून कुणाल घोटेकर, उन्मेश गेडाम व प्रा.देवेश मारोतराव कांबळे उभे होते. त्यात यंग टीचर्स असोसिएशन व महाआघाडीचे प्रा.देवेश कांबळे ४५ मते घेऊन मोठ्या फरकाने विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी उन्मेश गेडाम यांना १८, तर कुणाल घोटेकर यांना १५ मते मिळाली





