एटापल्ली नगरपंचायतीच्या पोटनिवडणूकीत आविसंच्या अश्विनी आईलवारचा विजय

0
8

आलापल्ली , दि. 15: एटापल्ली नगर पंचायतीच्या पोटनिवडणूकीत आदिवासी विद्यार्थी संघाच्या अश्विनी रमेश आईलवार यांनी विजय प्राप्त केला असून या नगर पंचायतीवर आविसने कब्जा केला आहे. माजी आमदार दिपकदादा आत्राम, जि. प. उपाध्यक्ष अजय कंकडालवर यांच्या नेतत्वात एटापल्ली नगर पंचायतीची निवडणूक लढविण्यात आली. आविसने अश्विनी रमेश आईलवार यांना उमेदवारी दिली होती. आज झालेल्या मतमोजणीत अश्विनी आईलवार यांना १४१ मते मिळाली. काॅंग्रेसच्या उषाताई अरविंद ठाकरे यांना १२३ मते, भाजपाच्या प्रिती महेश मोहूर्ले यांना ८७ मते प्राप्त झाली. यामध्ये शिवसेनेच्या सुष्मा बंडू मुलकलवार यांना ३१ मते मिळाली. नगर पंचायतीच्या या निवडणूकीत एकूण ३८६ मतदारांनी मतदानाची भूमिका बजाविली. यात 4 मतदारांनी नोटाला पसंती दर्शविली. आविसच्या अश्विनी आईलवार यांच्या विजयाबद्दल एकच जल्लोष साजरा करण्यात आला.