सुमनताई पाटील व कन्या स्मिता पाटील यांची आजपासून जिल्ह्यात

0
10

गडचिरोली ,दि.16- गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करणाºया स्व. आर. पाटील यांच्या पत्नी सुमनताई व मुलगी स्मिता पाटील ह्या गडचिरोली जिल्ह्याला भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान जिल्ह्यात सुरू असलेल्या मुक्तीपथ कार्यक्रमांतर्गत १६ व १७ डिसेंबर रोजी गडचिरोली, वडसा, चामोर्शी, अहेरी या हशरात जाहीर सभा घेऊना नागरिकांशी संवाद साधणार आहेत.आज १६ डिसेंबर रोजी सकाळी देसाईगंज येथील सिंधी भवन, सिंधी कॉलनी, हुतात्मा स्मारकाजवळ, दुपारी २ वाजता गडचिरोली येथील गोंडवाना कलादालनात सभेचे आयोजन करण्यात आले आहे. १७ डिसेंबर रोजी अहेरी येथे सकाळी ११ वाजता संत मानवदयाल अनु. प्राथमिक आश्रमशाळा मानव मंदिरात तर दुपारी २ वाजता चामोर्शी येथील नगर पंचायत सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे दोन वेळा गृहमंत्री राहिलेले आबा गडचिरोली जिल्ह्याचे लाकडे पालकमंत्री होते. मुंबईच्या सत्तेत राहून त्यांनी गडचिरोलीचे पालकत्व स्वीकारले आणि ते तितक्याच ताकदीने निभावले. आंबाचे असे अचानक जाणे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यासाठी दु:खाची घटना होती. गडचिरोलीवासीयांमध्ये तंबाखुबद्दल जागृती करण्यासाठी स्व. आंबाच्या पत्नी आ. सुमनताई पाटील व मुलगी स्मिता पाटील जिल्ह्यात येत आहेत. आबाप्रमाणेच इतरांचाही बळी जाऊ नये यासाठी त्या जिल्ह्यातील नागरिकांशी संवाद साधून तंबामुक्तीसाठी आवाहन करणार आहेत.