नांदेड जिल्हा होमगार्ड मध्ये रिक्त जागांसाठी दि.4 जानेवारीपासून नाव नोंदणी

0
36

नांदेड,दि.25ः- जिल्ह्यातील नांदेड, बिलोली,हदगाव, मुखेड व देगलूर पथकातील 87 पुरुष व 181 महिला होमगार्ड पदाच्या रिक्त जागांसाठी पुरुष व महिलांसाठी दि. 4 जानेवारी ते दि.6 जानेवारी 2018 या कालावधीत नाव नोंदणी करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी दिली.
होमगार्ड ही निष्काम सेवा ही ब्रिदवाक्य असलेले संघटन आहे. यामधील स्वयंसेवकांना कुठलाही नियमित पगार किंवा मानधन मिळत नाही.कर्तव्य बजावल्यानंतर त्यांना कर्तव्य आणि उपहार भता मिळतो.
होमगार्ड मध्ये नव्याने नाव नोंदणी साठी अटी पुढील प्रमाणे
उमेदवार हा किमान दहावी पास असावा, वयोमर्यादा 20 ते 50 वर्ष अशी आहे.
पुरुष उमेदवारांसाठी शारिरिक पात्रता
उंची किमान 162 से.मी. असावी. छाती किमान न फुगवता 76 से.मी. आणि फुगवून 81 से. मी. असावी.1600 मीटर धावणे, गोळाफेक ( वजन 7 किलो 260 किलो ग्रॅम.)
महिला उमेदवारांसाठी उंची किमान 150 से. मी. असावी. 800 मीटर धावणे. गोळाफेक ( वजन 4 किलो)
उमेदवारास चाचणीमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक प्रकारात कमीत कमी 40 टक्के गुण आवश्यक राहतील.
उमेदवारांनी नाव नोंदणीसाठी येताना दहावी पास असल्याचे मुळ प्रमाणपत्र , पासपोर्ट आकाराचे तीन कलर फोटो, शैक्षणिक प्रमाणपत्रे ,रहिवाशी पुरावा, ईतर प्रमाणपत्रे व सोबत साक्षांकित केलेल्या प्रती सोबत आणाव्यात.
या व्यतिरिक्त आय.टी. आय.प्रमाणपत्र, खेळाचे कमीत कमी जिल्हास्तरीय प्रमाणपत्र, माजी सैनिक,एन. सी. सी. B किंवा C प्रमाणपत्र, नागरी संरक्षण सेवेत असल्याचे प्रमाणपत्र, जड वाहन चालविण्याचा परवाना ही प्रमाणपत्रे तांत्रिक अर्हता गुण मिळविण्यासाठी सोबत आणावीत.
इच्छूक उमेदवारांनी
दि.4 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता पोलीस मुख्यालय कवायत मैदान, नांदेड येथे हजर रहावे. सकाळी 8 ते दुपारी 4 या कालावधीतच कागदपत्रांची तपासणी करण्यात येईल. व शारीरिक चाचणी घेण्यात येईल. सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेनंतर कुठल्याही परिस्थितीत नाव नोंदणी केली जाणार नाही.या प्रक्रियेत जे उमेदवार पात्र ठरतील त्यांची मैदानी चाचणी पुरुषांसाठी 1600 मीटर धावणे दि. 5 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजता शहिद भगतसिंघ चौक, असर्जन नाका विष्णूपुरी, नांदेड येथे घेण्यात येईल. या चाचणीनंतर लगेच त्याच भागातील मैदानावर गोळाफेक क्षमता चाचणी घेण्यात येईल.
दि.6 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजता महिला
उमेदवारांची 800 मीटर धावणे क्षमता चाचणी शहिद भगतसिंघ चौक, असर्जन नाका विष्णूपूरी रोड , नांदेड येथे घेण्यात येईल. व त्यानंतर लगेच गोळाफेक चाचणी क्षमता चाचणी घेण्यात येईल
त्यानंतर गुणवत्तेनुसार निवड यादी जाहीर करण्यात येईल.
होमगार्ड पदांच्या तालुका निहाय रिक्त जागा व नाव नोंदणी संदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हा प्रशिक्षण केंद्र होमगार्ड, किशोर नगर, भाग्यनगर जवळ, नांदेड येथे प्रत्यक्ष किंवा 02462 254261 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
सदरील नाव नोंदणीसाठी कुठलाही प्रवास भत्ता देण्यात येणार नाही. शारीरिक चाचणीच्या वेळी कोणताही अपघात घडल्यास त्याची संपुर्ण जबाबदारी ही उमेदवाराची राहील.
काही तांत्रिक अथवा अपरिहार्य कारणास्तव नावनोंदणी प्रक्रिया रद्द करण्याचा अधिकार जिल्हा समादेशक, होमगार्ड नांदेड यांना राहील.

ही नाव नोंदणी संपुर्णपणे मोफत आणि निःशुल्क आहे. या नाव नोंदणीसाठी जर कोणी पैशाची मागणी करीत असेल तर थेट लाच लुचपत प्रतिबंधक शाखा नांदेड यांच्याकडे 02462 253312 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. किंवा माझ्याशी 02462 232961 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केले आहे