कत्रांटदार म्हणतो होय मीच दिले जि.प.सदस्यांना टॅब

0
10

गोंदिया,दि.05ः-गोंदिया जिल्हा परिषदेच्या पदाधिकार्यांच्या अडीच वर्षाचा कार्यकाळ संपायला आल्याने सध्या विविध विषय समित्यांच्यावतीने शेवटच्या मासिक विषय समितीच्या बैठकीचे जंगी स्वरुपात आयोजन केले जात आहे.कुणी नवेगावबांध,गोठणगावला तर कुणी नागझिर्याला.तर कुणी जिल्हा परिषदेच्या कार्यालयातच बैठका घेऊन चांगल्या हाॅटेलमध्ये सायकांळची मेजवाणी करु लागले आहेत.सोबतच विविध विषय समितीच्या सदस्यांना भेटवस्तू सुध्दा दिल्या जाऊ लागल्या आहेत.त्यामध्ये सर्वाधिक चर्चेची समिती ठरली ती बांधकाम.गेल्या काही दिवसापुर्वी झालेल्या बांधकाम विषय समितीच्या बैठकीत समिती सदस्य असलेल्या 8े ते 10 जणांना चांगल्या कंपनीचे टॅब वितरीत करण्यात आल्याने जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये चांगलीच चर्चा रंगली.या चर्चेचा सुगावा घेण्याचा जेव्हा प्रयत्न केला असता काही सदस्यांनी होय टॅब मिळाल्याच कबूल करीत अंदाजे 10 हजाराच्या जवळील असावा असा कयास त्यांनी वर्तविला.जेव्हा 10 हजाराचा टॅब सदस्याना भेट स्वरुपात दिले गेल्याबाबत कार्यकारी अभियंता वैरागकर यांना विचारणा केली असता त्यांनी मात्र आपणास याप्रकरणात काहीच माहिती नसल्याचे सांगत बाजू झटकून घेतली.त्यानंतर मात्र एका कंत्राटदाराने चक्क होय मीच दिले ते टॅब अशी कबूली देत 10 हजाराचा नव्हे तर 8300 रुपयाचा तो टॅब असल्याचे चक्क तीनचार व्यक्तीसमोरच सांगून टाकले.यावरुन जर त्या कंत्राटदाराने टॅब दिले असेल तर का दिले.सभापती पकडून 9 सदस्य त्या समितीमध्ये आहेत.त्या 9 सदस्याकरीता 9 टॅब खरेदी ही 74700 रुपयाच्या जवळपासची होत असल्याने त्या कत्रांटदाराने आपल्या खिशातील पैसे का खर्च केले हा संशोधनाचा विषय ठरला आहे.तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या गोंदिया उपविभागातर्गंत अनेक रस्त्यांची कामे न करताच पैसांची उचल झाल्याचीही प्रकरणे समोर येत असल्याने त्या पैशातून तर हे टॅब वितरीत केले गेले नाही ना या चर्चांना उधाण आले आहे.