मोहाडी तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिवस साजरा

0
16

सालई खुर्द : दर्पनकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार अशोशियशन तुमसर तालुकाच्या वतीने दि. 6 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता मातोश्री लॅान मध्ये पत्रकार दिवस साजरा करण्याचे ठरले होते. त्याच अनुसंघाने वेळेचे औचित्य साधून मोहाडी तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने मराठी पत्रकार दिवस साजरा करण्यात आला. सर्व प्रथम मराठी वृत्तपत्राचे जनक आदरणीय दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन आदरांजली वाहण्यात आली. आजतक न्यूज चॅनेलचे संपादक, मा. दिपकजी शर्मा (दिल्ली) व वरिष्ठ संपादक न्यूज वर्ल्ड इंडियाचे मा. मनोजजी भोयर (मुंबई) यांचे मनोगत ऐकून मोहाडी तालुका मराठी पत्रकार संघाच्यावतीने त्यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत व नविन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आले. यावेळी मोहाडी तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विश्वकांत भुजाडे, सचिव चंद्रशेखर साठवने, उपाध्यक्ष संजय मते, सदस्य नितीन लिल्हारे,सदस्य दिपक घोडीचोर,सदस्य सुधीर गोमासे, व आधी पत्रकार बांधव उपस्थित होते