रेल्वे उड्डाणपुलाचे मनसे शिवसेनेने केले लोकार्पण

0
19

काटोल-पाचवर्षापुवीर्पासून कासवगतीने बांधकाम सुरु असलेल्या काटोल वळणमार्गावरील रेल्वेच्या उड्डाणपुलाच्या वऴणमार्गालगत येणारे रस्ते अजुनपर्यंत पुर्ण केलेले नसतानाही सुरु करण्यात आलेल्या टोलवसुलीचा निषेध मनसे व शिवसेनेच्यावतीने करुन रेल्वे उड्डाणपुलावरुन वाहतुक जाऊ नये यासाठी लावलेले बॅरीकेटस हटवून आज शनिवारी शिवसेना व मनसेच्या नेत्यांनी फित कापून पुलाचे लोकार्पण केले.मनसे तालुकाध्यक्ष दिलीप गायकवाड व शिवसेना तालुकाध्यक्ष दिपक रेवतकर यांच्या नेतृत्वात ,मनोज टेकाडे,प्रविण गोतमारे,मंगेश बांडेबुचे,कुशल वंजारी,तिलक शिरसागर,लक्ष्मण बागडे,अमित केने,बाळासाहेब उबळे,जंयत गवळी यांच्या उपस्थितीत या पुलावरील वाहतुक सुरु करण्यात आली.ठाणेदार भरत ठाकरे यांनी पुलावर पोचून सर्वांना ताब्यात घेऊन कलम 149 अंतगर्त धार 37 अन्वये जमावबंदी नोटीस देऊन सोडले.या पुलाच्या बांधकामाचा खर्च टोलवसुलीच्या माध्यमातून रोहण राजदिप टोलवेज कंपनी करीत आहेत.काटोलकडून जाणार्या वाहनाना टोलटॅक्स न देण्याचे आवाहन सेना व मनसेकडून करण्यात आले आहे.