रोसेयो विद्यार्थ्यांनी स्वच्छतेसाठी सहभाग दयावा – मुख्य कार्यकारी अधिकारी

0
9

• रासेयो विदयार्थ्यांच्या माध्यमातून करणार हागणदारीच्या जागेची स्वच्छता
• महिला डॉक्टर करणार मासिक पाळीबाबत मार्गदर्शन
भंडारा,दि.४:-:-राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे वतीने ग्रामस्तरावर सामाजिक बांधिलकीचे विविध कार्य पार पाडल्या जातात. त्यांचे कार्य व्याख्यानाजोगे असून आता रासेयो विदयार्थ्यांनी स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमात सहभाग घेवून सामाजिक दायत्विातून स्वच्छतेच्या कार्याने गावांना नंदनवन करण्यासाठी हागणदारीच्या जागा स्वच्छ व सौंदर्यीकरण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांनी केले. ते जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद भंडारा यांचे वतीने स्वच्छ भारत मिशन ग्रामीण कार्यक्रमांतर्गत आयोजित बैठकी प्रसंगी बोलत होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षते खाली त्यांच्या दालनात कक्षात पार पडलेल्या बैठकीत उप मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर सपाटे, जिल्हा कार्यक्रम समन्वयक श्री. शहा, क्षमता बांधणी तज्ञ अजय गजापूरे, अभियांत्रिकी तज्ञ दिपक बोडखे, व जिल्हयातील अकरा महाविदयालयाचे कार्यक्रम समन्वयक उपस्थिती होते.
भंडारा जिल्हयाची हागणदारीमुक्त प्लसच्या दिशेने वाटचाल सुरू झाली असून स्वच्छतेच्या कार्याला चालना देण्यासाठी अनेक ग्राम पंचायतीमध्ये गावातील हागणदारीच्या जागेची स्वच्छता व सौंदर्यीकरण करण्यासाठी पुढाकार घेण्यात आलेला आहे. स्वच्छतेबरोबरच आता प्लॉस्टीक बंदीची मोहिम राबविण्यात येत आहे. भंडारा जिल्हयात ही मोहीम अधिक गतीशिल व्हावी याकरिता आता रासेयो विभागांचा सहभाग घ्यायचा आहे. त्या उदेश्याने भंडारा येथील जे.एम.पटेल महाविदयाल व आठवले महाविदयालय यांचेसह जिल्हयातील अकरा महाविदयालयाची बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कक्षात बोलविण्यात आली होती.
रासेयो विभागांच्या कार्यक्रम अधिकारी यांना मार्गदर्शन करताना, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी म्हणाले, भंडारा जिल्हयात हागणदारीमुक्त्ा् प्लसच्या दिशेने वाटचाल करताना ग्रामस्तरावरील हागणदारीच्या जागेची स्वच्छता व सौंदर्यीकरण करण्याचा नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम संबंध राज्यात मार्गदर्शक ठरावा याकरिता महाविदयालयात कार्यरत रासेयो विभागांनी सहभाग दर्शवावा. गावात रासेयो विभागाचे कार्य वर्षानुवर्षापासून सुरू असून आता स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमात त्यांचा सक्रीय सहभाग व्हावा. हागणदारीच्या जागेची स्वच्छता करण्याच्या उपक्रमात महाविदयालयीन तरूणांचा सहभाग मिळाला तर हा कार्यक्रम जिल्हाभरात अधिक गतीने राबविता येईल. गावांचा चेहरामोहरा बदलविता येईल, गावांना नंदनवन बनविता येईल असे सांगितले.
प्रत्येक महाविदयालयांनी या करिता 3 गावे दत्तक घ्यावीत. त्या गावांमध्ये हागणदारीच्या जागेची स्वच्छता करण्यासाठी दिवसभर श्रमदान, स्वच्छता रॅली, पथनाटयांच्या माध्यमातून मार्गदर्शन करून जनजागृती करावी व भंडारा जिल्हयाला राज्यात दिशादर्शक ठरण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच गावात महिलांसदर्भात मासिक पाळीच्या जनजागृतीसाठी महिला डॉक्टरांचा सहभाग घेवून महिलांना मार्गदर्शन करण्यात येईल. घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन,शाळा व अंगणवाडी स्तरावर स्वच्छतेचे महत्व सांगून धडे देणे, प्लॉस्टीक बंदीसाठी वातावरण तयार करणे याकरिता कापडी पिशव्यांचा वापर वाढविण्यावर भर देणे, पावसाळयात वृक्षारोपणासाठी पुढाकार घेणे यासह गावांना स्वच्छ व सुंदर करण्यासाठी विविध उपक्रम या माध्यमातून राबविण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांनी आवाहन केले.

नागरिकांचे जिवनमान उंचावण्यासाठी, पर्यावरणाचे संवर्धनासाठी, निरोगी आरोग्यासाठी व विविध पैलूंनी महत्वाचा व नाविण्यपूर्ण, नागरिकांच्या हिताचे कार्य भंडारा जिल्हयात राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला अधिक गतिशील करण्यासाठी रासेयो विभागाचे जिल्हयातील अकरा महाविदयालयाचे कार्यक्रम अधिकारी यांनी सहभाग देण्याचे अभिवचन दिले. यावेळी जिल्हयातील जे.एम. पटेल महाविदयालयाचे कार्यक्रम अधिकारी श्री राजेंद्र शहा, आठवले समाजकार्य महाविदयालयाचे डॉ. नरेश कोलते, निर्धनराव पाटील महाविदयालयाचे लाखनी श्री यू.पी. शहारे, संताजी महाविदयाल पालांदूर संजयकुमार निंबेकर, श्यामरावबापू कापगते महावियालय साकोली प्रा. गणेश पाथोडे, कला वाणिज्य महाविदयालय पेट्रोल पंप जवाहरनगर विजय गणवीर, साई कला वाणिज्य महाविदयालय तूमसर संदीप चामट,समर्थ महाविदयालय लाखनीचे श्री धनंजय गि-हेपूंजे, निर्धनराव पाटील वाघाये महाविदयालय एकोडी चे डॉ. सोपान बोंडे, कला वाणिज्य महाविदयालय करडीचे निलकंठ सोनेकर यांची उपस्थित होते.