40.7 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ लाखनी येथे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा;स्वप्नपूर्ती फाउंडेशनचा उपक्रम

लाखनी येथे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा;स्वप्नपूर्ती फाउंडेशनचा उपक्रम

0
26

लाखनी,दि.११-ःहिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमीत्त लाखनी येथे स्वप्नपूर्ती फाउंडेशनच्या वतीने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. “जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज” हा या स्पर्धेचा विषय आहे. दि.१८ फेब्रुवारी २०१८ रोज रविवारला दुपारी २ वा. स्थानिक विवेकानंद वाचनालय सभागृह येथे ही स्पर्धा आयोजित केली असून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना, युवकांना या स्पर्धेत सहभागी होता येईल. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी स्पर्धा संयोजक लक्ष्मण बावनकुळे मो. 7875578762, सहसंयोजक विशाल हटवार मो. 7741862565, प्रशांत वाघाये मो. 8275397380, किशोर वाघाये मो. 9423413474,
यांच्याशी संपर्क साधावे असे आवाहन करण्यात आले आहे.
माननीय पालक तथा शाळा- महाविद्यालयांनी, शिक्षकवृंदांनी आपले पाल्य, विद्यार्थी या स्पर्धेसाठी पाठवावेत असे आवाहन स्वप्नपूर्ती फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत वाघाये, सचिव सुधीर काळे, सल्लागार अंगेश बेहलपांडे, अतुल भांडारकर, आकृती कंप्यूटर्सचे संचालक किशोर वाघाये, संजय वनवे, उमेश सिंगणजुडे, स्पर्धा संयोजक लक्ष्मण बावनकुळे, सहसंयोजक विशाल हटवार यांनी केले आहे. सदर स्पर्धेचे बक्षिस वितरण १९ फेब्रुवारीला समर्थ मैदान येथे होऊ घातलेल्या भव्य कार्यक्रमात करण्यात येईल.

blank