तंटामुक्त समित्यांनाही उत्कृष्ठ कामगिरीसाठी पुरस्कार

0
15

गोंदिया,दि.११- महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितींनी आपल्या क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबदद्दल तंटामुक्त अध्यक्ष आणि सदस्यांचा सत्कार २६ जानेवारी,१५ ऑगष्ट, १ मे च्या कार्यक्रमांत दरवर्षी पुरस्कार देऊन सत्कार करण्याची मागणी महात्मा गांधी तंटामुक्त समित्यांच्यावतीने करण्यात आली आहे.
शासनाने राज्यात २००७ पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती प्रत्येक गावात गठीत करुन गावात शांतता , सुव्यवस्था, अवैध धंदे, आंतरजातीय विवाह, गावात दारूबंदी, गावातील तंटे गावातच सोडविण्याचे काम करीत आहे.लोकांचे पैसे आणि वेळेची बचत होत आहे आणि पोलिस प्रशासनाचे अधिकचे काम कमी करण्याचे प्रयत्न तंटामुक्त समितींच्या माध्यमाने होत आहे.जिल्ह्यातील संपूर्ण तंटामुक्त गाव समिती चांगल्या प्रकारे कामे करीत आहेत.त्यामुळे,विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाèया व्यक्तींमध्ये तंटामुक्त समित्यांचाही समावेश करण्याची मागणी तंटामुक्त गाव समिती संघटना जिल्हा गोंदिया जिल्हा अध्यक्ष राजेशकुमार तायवाडे,जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भगत,मुमताज अली सैयद,श्रावण बरियेकर, कार्याध्यक्ष हमजाभाई शेख, विनोद बरेकर,पंकज मेश्राम, सचिन दरवडे,गजानन पटले, माधुरी रहांगडाले,चुन्नीलाल बिसेन, विठोबा बिसेन, नंदकिशोर शरणागत यांनी केलेली आहे.