मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अर्जुनी मोरगाव येथे

0
8

गोंदिया,दि.16ः-
वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र व डॉ. बाबासाहेब समता प्रतिष्ठान नागपूरच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अर्जुनी-मोर येथील संत चोखोबा नगरीत ७ व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनांला शुक्रवारी (दि.१६) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते मान्यवरांना पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.
दुपारी 12 वाजता संत चोखोबा नगरीत आयोजित या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सप्तखंजेरीवादक हभप सत्यपाल महाराज यांना संत चोखामेळा पुरस्कार, अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथील जनार्दन बोये यांना मरणोत्तर पुरस्कार, नागरवाडी येथील बापूसाहेब देशमुख यांना जीवनगौरव पुरस्कार, पंढरपूरचे हभपं बाबामहाराज राशनकर यांना पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे.
यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री तथा स्वागताध्यक्ष राजकुमार बडोले, सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे, हभप डॉ. रामकृष्ण महाराज लहलितकर, सचिव डॉ. सदानंद मोरे, अध्यक्ष हभप विठ्ठल पाटील प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.