पालकमंत्र्याच्या गृहनगरीत वाहनधारकांचा मोर्चा,शासन निर्णयाची होळी

0
11

सडक अर्जुनी,दि.16 – तालुक्यातील शिव श्री बिल्डिंग मटेरियल सप्लायर संघटनांच्या वतीने आज सडक अर्जुनी तहसील कार्यालयावर महाधडक मोर्चा ट्रॅक्टर रॅलीच्या स्वरूपात काढून शासन धोरणाचा निषेध नोंदविण्यात आला.हा मोर्चा सावंगी ते सडक अर्जुनी या मार्ग काढण्यात आला.या मोर्च्यात तालुक्यातील 150 ते 200 ट्रक्टर सहभागी झाले होते.
यामध्ये बिल्डींग मटेरियल ट्रॅक्टर धारकांनी सरकारविरोधात घोषणा करीत आपल्या मागण्या ठेवल्या. त्यानंतर सभा घेत आपल्या मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार अखिल भारत मेश्राम यांना सादर केले.संघटनेचे अध्यक्ष माधोरावजी तारोने यांनी मार्गदर्शन करताना या सरकारने गोरगरिबांची फसवणूक केली आहे.तथा ओबीसी समाजाची पिळवणूक केल्याची टिका केली आहे.शासनाच्या नवीन शासन निर्णयानुसार बिल्डिंग मटेरियल धारकांना मोठा फटका बसणार आहे.त्याकरीता शासनाने या जी.आर.मध्ये बदल करून जुन्याच जी.आर.प्रमाणे काम चालू ठेवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली.अन्यथा संपूर्ण जिल्ह्यातील संघटना मिळून शासनाचे काम बंद करू आणि कोणत्याही परिस्थितीत मटेरियलची पुर्तता करणार नाही असे म्हटले.