26.3 C
Gondiā
Friday, August 28, 2026
Home विदर्भ खा.पटेलांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी

खा.पटेलांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी

0
25

गोंदिया,दि.18ः- राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार(दि.17)ला तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केन्द्र एकोडी येथे निशुल्क आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात रक्तदान, बाल रोग , नेत्र रोग , महिला विशेषज्ञांनी सहभाग घेऊन शिबिरात सहभागी लोकांची तपासणी केली.या शिबिराचा 350 लाभार्थ्यानी लाभ घेतला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विनोदभाऊ हरिनखेडे होते.प्रमुख अतिथी म्हणून जयप्रकाश बिसेन पंचायत समिती सदस्य, अशोकभाऊ रिनयात अध्यक्ष सेवा सहकारी संस्था,सरपंच रवी पटले,त. मु. समिती अध्यक्ष राजेश तायवाडे, ग्राम पंचायत सदस्य नामदेव बिसेन, घनश्याम पटले, गिताताई भलवी, मायाताई तायवाडे , चन्द्रप्राभाताई पटले,सामाजिक कार्यकर्ता सुरेशजी भगत, विषनुदयाल बिसेन आदि उपस्थित होते . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैद्यकीय अधिकारी डॉ.निरंजन अग्रवाल,डॉ.भीष्मकुमार कटरे व प्राथमिक आरोग्य केंद्रतील सर्व कर्मचार्यानी सहयोग दिला. कार्यक्रमात अदानी फ़ाऊन्डेशनचे सहकार्य लाभले.