आमगाव खुर्द निवडणूक रद्द करण्याची गावकऱ्यांची मागणी 

0
13

सालेकसा,दि.18ः- बहुचर्चित आणि वादग्रस्त असलेली आमगाव खुर्द ग्राम पंचायत अजून एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. येत्या 27 तारखेला होऊ घातलेल्या सार्वत्रिक ग्राम पंचायत निवडणूक मध्ये आमगाव खुर्द ग्राम पंचायतचा समावेश आहे. त्या अनुषंगाने 14 जानेवारी ही उमेदवारी अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. गावकर्यांनी ह्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय आधीच घेतले असता त्या संमिश्र प्रतिसाद मिळाला असून प्रभाग क्रमांक 3 साठी 2 आणि प्रभाग क्रमांक 5 साठी 2 तर सरपंच पदाच्या उमेदवारीसाठी 3 अर्ज दाखल करण्यात आले होते. 16 तारखेला मात्र सर्वमताने आणि गावकर्यांनी चर्चा करून बहिष्काराच्या समर्थनार्थ उमेदवारी अर्ज परत घेतले. असे असले तरी प्रभाग क्रमांक 5 मधून एक उमेदवारी अर्ज स्थायी असून एका जागेसाठी ही निवडणूक बिनविरोध होण्याचे चिन्ह आहेत.

ह्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार यादीमध्ये घोळ असल्याचा दावा गावकर्यांनी केला आहे. आमगाव खुर्द ग्राम पंचायत आणि सालेकसा नगर पंचायत हे लागूनच असल्याने काही मतदारांचे नाव हे दोन्ही ठिकाणी असल्याचे खळबळजनक बाब समोर आली आहे. ह्या आरोपाला सिद्ध करण्यासाठी गावकर्यांनी दोन्ही ठिकाणची मतदार यादी दाखवत दोन्ही ठिकाणी असलेले नाव समोर करून दाखवले आहेत. ही ग्राम पंचायत निवडणूक रद्द करून मतदार यादीत सुधारणा करावी अशी मागणी गावकर्यांनी तहसीलदार प्रशांत सांगडे ह्यांचा कडे केली आहे. मतदार यादीत असलेल्या ह्या चुकांमुळे येणाऱ्या निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे निकालात बदल होण्याची शकत्या टाळता येत नाही. उद्या निकाल चुकीचं असल्याचा दावा करत पराजित उमेदवार न्यायालयात दाद मागायला गेले तर पुनः निवडणूक होणार आणि शासकीय पैशाची नासाडी होऊ शकते. करिता ही निवडणूक त्वरित रद्द करावी अशी मागणी गावकर्यांनी केली आहे. ह्या मागणीचे अर्ज करताना सर्व पक्षाचे तालुका अध्यक्ष, कार्यकर्ते, ग्राम विकास आघाडी, गावकरी, सामाजिक कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. ह्या निवेदनासोबत काही निवडक मतदारांचे नाव जे दोन्ही ठिकाणी नोंदणी केलेली आहे त्यांचा तक्ता सोबत जोडून दिला आहे.

आधीच आमगाव खुर्द ग्राम पंचायत सालेकसा नगर पंचायत मध्ये समाविष्ट करण्यासाठी याचिका उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे दाखल केलेली आहे. ह्या आधी सुद्धा ग्राम वासीयांनी बहिष्कार करून विलीनीकरणाची मागणी केली होती. आमगाव खुर्द बाहेरील काही विशिष्ट लोक निवडणुकीत हस्तक्षेप करून निवडणुकीवर अंतर टाकून गावातील एकोप्याला तडा टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सुद्धा गावकरी करत आहेत. ह्या निवडणुकीवर जनप्रतिनिधी सुद्धा हस्तक्षेप करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पुन्हा बहिष्कार करत विलीनीकरणाची मागणी केली असता बहिष्काराला 100% प्रतिसाद मिळू शकला नाही आणि 1 जागेवर निवडणूक बिनविरोध होण्याची चित्र समोर असताना मात्र मतदार यादीतील घोळ निवडणूक रद्द होणार असे दिसून देत आहे. ह्या प्रशासकीय चूकीमुळे आमगाव खुर्द चे राजकारण वेगळ्या थरावर गेले आहे. ही चूक आता कोणाच्या गळ्यात पडते आणि कोण अधिकारी गोत्यात सापडतो ह्याकडे विशेष लक्ष वेधले गेले आहे.