26.3 C
Gondiā
Friday, August 28, 2026
Home शैक्षणिक बारावीच्या प्रवेशपत्रावर उपकेंद्रांचा नाही उल्लेख; २१ फेब्रुवारीपासून परीक्षा

बारावीच्या प्रवेशपत्रावर उपकेंद्रांचा नाही उल्लेख; २१ फेब्रुवारीपासून परीक्षा

0
21

गोंदिया,दि.18 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेतल्या जाणाºया बारावी परीक्षेच्या प्रवेशपत्रांचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे. या प्रवेशपत्रांवर केवळ परीक्षेच्या मुख्य केंद्राचाच उल्लेख आहे. मात्र त्या केंद्राअंतर्गत असलेल्या उपकेंद्रावर जर बैठक व्यवस्था करण्यात आली असेल तर त्याचा उल्लेखच प्रवेशपत्रावर करण्यात आलेला नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतो आहे.गोंदिया जिल्ह्यात 12 वीचे 73 परिक्षा केंद्रावर 22490 विद्यार्थी परिक्षा देणार तर 10 वी चे 89 परिक्षा केंद्रावर 22 हजार 648 विद्यार्थी परिक्षा देणार आहेत.या काळात परिक्षा केंद्रावर भेट देण्यासाठी 7 भरारी पथक तयार करण्यात आले आहेत.7 व्या भरारीपथकात जिल्हाधिकारी यानी नेमलेेल्या अधिकार्यांच्या समावेश आहे.बारावीमध्ये उपद्रवी परिक्षा केंद्र म्हणून परसवाडा व 10 मध्ये घाटटेमणीचा समावेश नागपूर परिक्षा मंडळाने केलेला आहे.
राज्य मंडळाकडून घेतली जाणारी बारावीची परीक्षा येत्या २१ फेब्रुवारीपासून होणार आहे. राज्यभरातून १४ ते १५ लाख विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयांकडून नुकतेच प्रवेशपत्रांचे वाटप करण्यात आले आहे.

परीक्षेला उशिरा आल्यास प्रवेश नाही
दहावी-बारावीच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका व्हॉट्सअ‍ॅपवरून फुटू लागल्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रात उपस्थित राहणे बंधनकारक आहे. परीक्षा केंद्रात येण्यास उशीर झाल्यास त्यांना प्रवेश दिला जाणार नाही, असे यापूर्वीच राज्य मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी थेट परीक्षेच्या दिवशी केंद्रावर न जाता त्यापूर्वीच बैठकव्यवस्थेची माहिती घ्यावी.