कर्जमाफी दिलेल्या शेतकऱ्यांकडून व्याज वसूल करू नये

0
5

चंद्रपूर,दि.18: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत शासनाने कर्जमाफी दिलेल्या किंवा एकरकमी परतफेड योजनेअंतर्गत मंजूर कर्ज खात्यावर ३१ जुलै २०१७ नंतरचे व्याज बँकांनी वसूल करु नये. याबाबत राज्यस्तरावर एसएलबीसीच्या बैठकीमध्ये बँकांनी व्याज वसूल करु नये, असा निर्णय झालेला असून या निर्णयाचे सर्व बँकांनी तंतोतंत पालन करण्याचे निर्देश सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये शनिवारी सहकार विभागाच्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते. यावेळी आ. नाना श्यामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊनकर, सहकार विभागाचे विशेष कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था प्रवीण वानखेडे, जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सरव्यवस्थापक एम. व्ही. पोटे, सहकार क्षेत्रातील संबंधित विविध अधिकारी व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.