24.2 C
Gondiā
Saturday, August 22, 2026
Home विदर्भ गायींची स्कॉर्पिओतून तस्करी

गायींची स्कॉर्पिओतून तस्करी

0
30

तुमसर,दि.21ः- गायींचे तोंड बांधून स्कॉर्पिओ वाहनातून त्यांची तस्करी करण्याचा प्रकार काही युवकांच्या सतर्कतेने गोबरवाही येथे उघडकीस आला. यातील सुटका केलेल्या गायी जखमी असून त्यांना गौरक्षण संस्थेत हलविण्यात आले.
गोबरवाही येथे मंगळवारी पहाटेच्या सुमारास एक स्कॉर्पिओ टायर फाटल्याने रस्त्यात उभी होती. स्कॉर्पिओचा चालक पळून गेला होता. काही तरूणांना या वाहनात हालचाल होताना दिसून आली. परंतु, स्कॉर्पिओच्या काचा गडद असल्याने काही दिसत नव्हते. सारख्या हालचाली होत असल्याने तरूणांनी काचा फोडल्या तेव्हा त्यांना सहा गायी निर्दयपणे कोंबून ठेवल्याचे दिसून आले. त्यातील काही गायींचे पाय तुटले होते. गायींची सुटका करताच एक गाय जंगलात पळून गेली.
स्कॉर्पिओमध्ये वाहनचालकाची फक्त एकच सीट होती. उर्वरित जागी गायींना कोंबण्यात आले होते. सदर गायींना कामठी येथे नेले जात असल्याची माहिती आहे. या प्रकरणी गोबरवाही पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. या आंतरराज्य सिमेवर तपासणी नाक्याची गरज आहे.