तिरोडा नगर परिषदेत घरकूल घोटाळा

0
12

तिरोडा,दि.21 : नगर परिषद क्षेत्रातील गरीब गरजू लोकांना घरकुल योजना केंद्र व राज्य सरकार असून यात घरकुल वाटपात मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.याप्रकरणात पदाधिकारी व अधिकाऱ्यांवर कार्यवाही होऊ शकते. सदर घरकुल शौचालयाचे प्रकरण मोठ्या नेत्यापासून दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप अखील भारतीय मानवाधिकार असोसिएशन गोंदिया जिल्हा प्रा. सी.जी. कुरेशी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीतून केला आहे.
नगर परिषद क्षेत्रातील गरीब, दलीत, आदिवासी, ज्यांच्याजवळ घर नाही, क्षतीग्रस्त अशांना देणे आवश्यक होते. पण ज्यांच्याजवळ पक्के घर, राहण्यासाठी असून त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असून त्यांना घरकुलाचा लाभ देण्यात आला. त्यांनी मजल्यावर मजला चढवून बंगला तयार केले आहे. अंदाजपत्रकानुसार घरकुल तयार न करता बंगले तयार केले आहे.
एका परिवारातील पत्नी, पती, मुलगा, सुन, नातूच्या नावानेही पाच पाच घरे दिली आहेत. जागा एकच तीच जागा दाखवून घर तयार केले. नगर परिषदेत काम करणारे कर्मचारी यांना देखील घरकुलाचे वाटप करण्यात आले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.दुसºयांची जमिनी दाखवून शौचालय वेगळे दाखवून १२ हजार रुपयांचा लाभ दिला आहे. घरकुलात शौचालय समाविष्ठ असून त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. याची चौकशी करुन संबंधित अधिकारी व अभियंता यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी मानवाधिकारा संघटना गोंदिया जिल्हाध्यक्ष यांनी केली आहे.अन्यथा नगर परिषद कार्यालयासमोर उपषोणावर बसण्याचा इशारा दिला आहे. नाली, रस्ता, बाजार निलामी यातही गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले आहे.