24.5 C
Gondiā
Friday, August 21, 2026
Home विदर्भ तिरोड्यात शिवसेनेचा शिवसंपर्क अभियान

तिरोड्यात शिवसेनेचा शिवसंपर्क अभियान

0
29

तिरोडा,दि.24ः- शिवसेनेच्यावतीने लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसंपर्क अभियानांतर्गत चाचपणी तसेच शिवसेना पक्ष बांधणीच्या अनुषंगाने बुधवारला तिरोडा विधानसभा मतदारसंघाचा आढावा विधानसभा मतदारसंघाचे निरिक्षक शुभाष राठोड़ यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकित घेण्यात आला.या बैठकीत पक्षबळकटीकरणासह विविध विषयावर चर्चा करण्यात आली. शुभाष राठोड़ यांनी मतदारसंघातील नागरिकांसह कार्यकर्ते,व पदाधिकारी यांचीही भूमिका एैकून घेतली.यावेळी शिवसेना गोंदिया जिल्हाप्रमुख राजकुमार कुथे,तिरोडा शिवसेना तालुका प्रमुख राजु चामट,शिवसेना शहर प्रमुख कमलेश मलेवार,उपतालुका प्रमुख महेन्द्र भांडारकर, युवासेना तालुका अधिकारी कपिल भोंडेकर,युवासेना तालुका प्रवक्ता शुभम सोनवाने, शिवसेना व युवासेने चे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.