परीट समाजाच्या समस्या शासनापुढे मांडणार

0
15

गडचिरोली,दि.25 : संत गाडगेबाबांच्या विचारांचा वारसा लाभलेला परीट समाज आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. समाजाच्या उत्थानासाठी नियोजनात्मक लढाई लढावी लागणार आहे. आपल्याला समाजाच्या समस्यांची जाणीव असून या समस्या सोडविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असे आश्वासन राज्याचे दुग्धविकास, पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी दिले.
श्री संत गाडगेबाबा स्मृती संस्था गडचिरोली तथा धोबी, परीट, वरठी सेवा संघटना जिल्हा गडचिरोलीच्या वतीने स्थानिक पटेल मंगल कार्यालयात श्री संत गाडगेबाबा जयंती महोत्सव शुक्रवारी पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन महादेव जानकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय गोरडवार होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य अतुल गण्यारवार, राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ अध्यक्ष अ‍ॅड. मनोज साबळे, भंडार जिल्हा दुग्धसंघाचे अध्यक्ष रामदास चौधरी, विनोद कोल्हटकर, अरुण पेंदोरकर, दयाराम मेश्राम, प्रमोद केळझरकर, भैय्याजी रोहणकर, स्वप्नील वरघंटे, कवडू पेंदोरकर, विजय कामनपल्लीवार, सतीश मेश्राम, प्रल्हाद कावळे, रमेश गुंडमवार, सुरेश केळझरकर, अमोल गण्यारपवार, संगीता गडपायले, रोशनी वरघंटे, मंगला केळझरकर, शोभा रासेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना जानकर म्हणाले परीट समाजावर आरक्षणाच्या बाबतीत अन्याय झाला आहे. आरक्षण देत असतांना अडचणी येत असल्या तरी त्याचा अभ्यास करावा लागेल. संत गाडगेबाबांचा वारसा सांभाळतांना त्यांचे विचार आत्मसात करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहाबरोबरच इतर शैक्षणिक सुविधा निर्माण करण्यासाठी लढा उभारावा. समाजाचे आर्थिक मागासलेपण दूर करण्यासाठी सजातील युवकांनी उद्यागाची कास धरणे आवश्यक आहे. समाजाच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्री व पंतप्रधानांसमोर समाजाचा वकील म्हणून उभे राहण्याची आपली तयारी असल्याचेही त्यांनी सांगीतले. विजय गोरडवार यांनी मार्गदर्शन करताना समाजातीच्या समस्या मांडल्या. कार्यक्रमाचे संचालन साई कोंडावार यांनी मानले.