साकोली,दि.25:बिलासपूर येथे आयोजित राष्ट्रीय पोस्टर स्पर्धेत एकता टेंभरे हिने प्रथम क्रमांक पटकाविला. एकता ही वैनगंगा बहुउद्देशिय विकास संस्थेद्वारा संचालिक बाजीराव कॉलेज ऑफ फार्मसी साकोली येथील बी.फार्म चतुर्थ वर्षातील विद्यार्थिनी आहे. ‘मोहाच्या फुलांचे बुरगे आणि अँटीअँक्सीडेंटच्या संभावतेने निर्धारण’ या विषयावर सदर स्पर्धा बिलासपूर येथे पोस्टर स्पर्धा पार पडली. तिने आपल्या यशाचे श्रेय संस्थाध्यक्ष डॉ. ब्रम्हानंद करंजेकर, सचिव डॉ. वृंदा करंजेकर, प्राचार्य डॉ.दामोदर गौपाले, प्रा. डॉ. सलिम फारूकी आदींना दिले.





