28.1 C
Gondiā
Saturday, August 15, 2026
Home विदर्भ तालुक्यात १८ मामा तलाव खोलीकरणाचे भूमिपूजन

तालुक्यात १८ मामा तलाव खोलीकरणाचे भूमिपूजन

0
31

गोरेगावः,दि.२८-गोरेगाव-तिरोडा विधानसभा मतदारसंघात येत असलेल्या तालुक्यातील १८ मालगुजारी तलावांच्या खोलीकरणासोबतच गाळ काढण्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार विजय रहागंडाले यांच्या हस्ते नुकतेच पार पडले.यामुळे तालुक्यात ३० टक्के सिंचनक्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाच्यावतीने या तलावांच्या खोलीकरणाचे काम करण्यात येणार आहे.याभूमिपूजन कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती विश्वजीत डोंगरे,पंचायत समिती सभापती माधुरी टेंभरे,माजी सभापती पी.जी.कटरे,पंसचे माजी उपसभापती सुरेद्र बिसेन,जि.प.सदस्य रोहीणि वरखडे,ललिता चौरागडे,सरपंच माया कटरे,तेंजेंद्र हरिणखेडे,उषा पंधरे,हेमलता हरिणखेडे,,लक्ष्मण भगत,डुमेश चौरागडे,अनंता ठाकरे,दिप्ती पटले,उपविभागीय अभियंता निलिमा मंडपे,शाखा अभियंता प्रदिप रहागंडाले,तहसिलदार कल्याण डहाट आदी उपस्थित होते.
हिरापूर येथे ४ तलावांच्या खोलीकरणावर ५१ लाख, तिमेझरी येथील ३ तलावांच्या खोलीकरण व दुरुस्तीवर ४७ लाख,डव्वा येथील २ तलावांच्या खोलीकरण व दुरुस्तीवर ५९ लाख,पुरगाव येथील ३ तलावांच्या खोलीकरणावर ५३ लाख,मोहगाव(बु.)येथील ४ तलावांच्या खोलीकरणवर ५४ लाख तसेच शहारनावनी येथील १ तलावाच्या खोलीकरणावर ४० लाख रुपये खर्च होणार आहेत.